बाहुली विहीर सानगडी स्वच्छता व संवर्धन मोहीम यशस्वी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, विभाग भंडाराच्या वतीने बाहुली विहीर, सानगडी ता. साकोली जि.भंडारा येथे शनिवार, दिनांक ११ मे २०२४ रोजी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत प्रतिष्ठानच्या २१ मावळ्यांनी सहभाग घेतला. सानगडीमध्ये दोन प्राचीन बाहुली विहिरी (पायरीची विहीर) आहेत. ही बावडी केवळ जलस्त्रोतच नव्हे तर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. बांधकाम केवळ दगड चुन्याने केले आहे. या विहिरीत ५० ते ६० पायºया आहेत. आतील भागात राहण्यासाठी मोठमोठ्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये भोसलेकालीन लोक युद्धाच्या वेळी मुक्कामाने राहायचे. गुप्त खलबते, सल्लामसलती करण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा. खोल्यांच्या पुढे आतमध्ये गेल्यावर खोल गर्तेत वर्षभर थंडगार पाणी असते. परंतु, अलीकडे त्यांचा वापर कोणी करीत नाही. दोनपैकी एक विहीर बुजली आहे. या विहिरींची अवस्था सुद्धा अशी होऊनये याकरिता स्वच्छता मोहीम राबवून विहिरी स्वछ करण्यात आली. बाहुली विहीरीच्या भोवती व विहिरीत वाढलेल्या अतिरिक्त झाडांमुळे दिसेनासी झाली होती. विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या पायरी मार्गावर झालेली घाण, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, विटांचे, कवेलूनचे तुकडे, केरकचरा आणि मातीमुळे पायºया व खोलीत जाणारे पायरीमार्ग बंद होण्याच्या वाटेवर आले होते.

स्थानिक लोकांच्या दुर्लक्षित पणामुळे अश्या ऐतिहासिक वास्तू या जीर्ण होऊन भविष्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. ‘कार्य असं असावं की ऐतिहासिक वारसास्थळे जतन आणि संवर्धन कार्यात आपलं आयुष्य कामी यावं’… अश्या ऊर्जा देणाºया मित्रांच्या साथीने आपले ऐतिहासिक वारसास्थळे, आपला अभिमान हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन “सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान” भंडारा व गोंदिया विभाग तर्फे बाहुली विहीर स्वच्छता मोहिमेत विहिरीवरील व आतील बांधकामाला नुकसान करणारे अतिरिक्त झाडे, परिसरातील कचरा, गवत, अतिरिक काटेरी झाडे, प्लास्टिक बॅग, पॉलिथिन, प्लास्टिक पाण्याच्या बॉटल्या, काचेच्या, दारूच्या बाटल्या तसेच विहिरीवरील मोकळी जागेत साठलेला कचरा झाडून संपूर्ण परिसर साफ करण्याचे काम करण्यात आले. या मोहिमेला उपस्थित सह्याद्री प्रतिष्ठान भंडारा जिल्हा प्रशासक निखिल कुंभलकर, नरेंद्र गिºहेपुंजे, अंकित कोहळे, विक्की राऊत, वंशिका गिºहेपुंजे, सहयाद्री प्रतिष्ठान गोंदिया गौरव लंजे, गिरीश लंजे, गुणेश डोंगरवार, शुभम पुस्तोडे, साकोली तालुका प्रतिनिधी गणेश खरकाटे, सुरज शिवणकर, शुभमशिवणकर, भुपेश खोटेले, पराग खोटेले, गणेश कापगते, चेतन कापगते, छगन कापगते, सह्याद्री प्रतिष्ठान मोहाडी श्रीकांत निमकर, मंगलदीप मते तसेच सानगडी ग्रामचे माजी उपसरपंच चतुर्भुज भानारकर, घनश्याम गोटेफोडे व गावातील मान्यवर व इतर ग्रामस्त उपस्थित होते. या मोहिमेकरिता परवानगी व सकारात्मक प्रोत्साहन दिल्या बद्दल प्रतिष्ठानच्या वतीने विशेष आभार व धन्यवाद सौ. सविता उपरिकर, सरपंच, ग्रामपंचायत सानगडी, भुमेश्वर ब्राह्मणकर, उपसरपंच, सानगडी तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ऐतिहासिक किल्ले, वारसा स्थळे आणि त्याचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला अनुभवता यावा या हेतूने सर्वांनी एकत्र येऊन संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने आवाहन करण्यात येते की गडकिल्ले व ऐतिहासिक सर्व पर्यटन स्थळी जातांना आपल्यामुळे त्या ठिकाणी कचरा तसेच ऐतिहासिक वास्तूस नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *