भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सीतासावंगी येते. या सीतासावंगी आरोग्य उपकेंद्राची बोअरवेल मागील एका वर्षा पासून बिघडलेली आहे. येथील कर्मचारी, अधिकारी, सी.एच.ओ डॉक्टर ज्योती तिवारी, एएनएम उज्वला केळोदे, पी.टी.ए सखु खोडपे यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सितासावंगी येथील बोरवेल बिघडलेली आहे, अशी तक्रार वारंवार ग्राम पंचायत सीतासावंगी व आरोग्य विभागाकडे केली असून ग्रामपंचायत सीतासावंगी चे पदाधिकारी व आरोग्य विभाग एक वर्षा पासून गाढ झोपलेले असून आज पर्यंत कुंभकर्णीय झोपेतून जागा व्हायला आहेत. सध्या प्रचंड उष्णतेचा मे महिना सुरु असून रोज दिवसा ४० ते ४५ डिग्री असा उष्ण तापमान राहतो. अश्या तापमानामध्ये आरोग्य उपकेंद्र सीतासावंगी येथील कर्मचारी आणि शारीरिक तपासणी आणि उपचारा करिता आलेले रुग्ण लोकांना तहान लागलेली असल्यास पाणी पिण्याकरीता गावातील बोरवेलवर अथवा गावातील लोकांच्या घरी पाणी मागायला जावे लागत आहे. दवाखान्यामधील बोअरवेल एक वर्षा पासून बंद पडून असल्यामुळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या छतावरील पाण्याची टाकी पाणी विना नेहमी खाली राहते. त्यामुळे दवाखान्यामध्ये आरो मशीन लावलेली तर आहे पण टाकी मध्ये पाणी नसल्यामुळे आरो फिल्टर मशीन सुद्धा एक वर्षापासून बंद पडलेली आहे.
आरोग्य विभागाच्या नियमानुसार आरोग्य विभागाचे पदाधिकाºयांची २४ तास ड्युटी राहत असून शासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना नोकरी असलेल्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे. या नियमानुसार उपकेंद्र सीतासावंगीच्या इमारतीच्या सरकारी निवासामध्ये आरोग्य कर्मचारी राहत असून त्यांना पण पिण्याच्या पाण्याकरिता व दिवस भर जीवनोपयोगी लागणारे आवश्यकता असलेले इतक्या पाण्याकरीता गावातील दुर बोअरवेलवर पाणी आणायला जावे लागते. आरोग्य विभागा तर्फे सर्व सामान्य गावकºयां करीता शासनाचे उपक्रम राबवले जातात. या आरोग्य उपक्रममध्ये प्रत्येक दिवशी सकाळी नऊ वाजता पासूनते सायंकाळी पाच वाजता पर्यंत सीतासावंगी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चा वेळ असून सीतासावंगी व आजू बाजूच्या गावातील रुग्ण आरोग्याची तपासणी करण्या करिता दिवस भर येत जात असतात, या ऐवजी महिन्याच्या पहिला आणि तिसरा शुक्रवार या दिवशी छोट्या मुलांच्या लसीकरण कार्यक्रम असतो. गरोदर स्त्रियांकरिता महिन्याचा पहिला, तिसरा आणि चौथा मंगळवार हे दिवस नेमले असून या दिवशी सकाळी नऊ वाजता पासून सायंकाळी पाच वाजता पर्यंत गरोदर महिलांच्या गर्भाशयाची तपासणी केली जाते.
या दिवशी तपासणी करिता आलेल्या महिलांची प्रचंड गर्दी असल्यामुळे गरोदर महिलांना तपासणी करिता पुष्कळ वेळ पर्यंत थांबावे लागते, महिला गरोदर असल्यामुळे गरोदर महिलांना पुष्कळदा लघूशंकेकरिता जावेलागते, मात्र लघुशंकेच्या निवारणाकरिता आरोग्य उपकेंद्र सीतासावंगी मध्ये संडास अणि बाथरूम ची सुविधा तर केलेली आहे, पण सीतासावंगी आरोग्य उपकेंद्रा मधील बोअरवेल एक वर्षा पासून बिघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे आरोग्य उपकेंद्रची पाणी टाकी पाणी विना खाली पडलेली राहत असून संडास अणि बाथरूमच्या नळामध्ये पाणी येत नाही. त्यामुळे संडास बाथरूमच्या रुग्णांद्वारे वापर केल्यास नळात पाणी येत नसल्यामुळे कोणीही संडास बाथरूम मध्ये पाणी घालत नाही. यामुळे संडास बाथरूम चा घाणेरडा वास इमारतीमध्ये येत राहतो. या दुर्गंधीमुळे आणि स्वच्छतेच्या अभावामुळे उपचाराकरिता आलेले रुग्ण दुरुस्त निरोगी होण्यापेक्षा आणखी बिमार होण्याची शक्ता बळावली आहे. करीता ग्राम पंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाने आरोग्य उपकेंद्र सितासावंगी येथील एक वर्षा पासून मृत अवस्थेत पडलेली बोअरवेल मशीन दुरुस्त करावी किंवा आरोग्य उपकेंद्राला नवीन बोअरवेल मशीन द्यावी जेणे करून पिण्या करिता पाणी आणि आरोग्य उपकेंद्रच्या इमारती मध्ये इतर वापराकरिता लागत असलेल्या पाण्याच्या प्रश्न सुटेल, आता रुग्ण आणि आरोग्य कर्मचाºयांना पाणी मिळत नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण या सर्वांना पाण्याकरिता होत असलेल्या त्रासाचा लवकरात लवकर निकाल केव्हा लागेल? याची वाट आहे.