मजुर नेणारे वाहन उलटले; तब्बल २७ महिला मजुर जखमी

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज सकाळी ७.३० वाजता दरम्यान मजुर नेणारे वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले. त्यात वाहनातील २७ मजुर जखमी झाले. त्यातील १४ मजुरांवर उपचार सुरू आहेत. तर २ गंभिर जखमी मजुरांना भंडाºयाला हलविण्यात आले. जखमी मजुर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते. पवनी तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी हार्वेस्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत. धान कापणीला मजुर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेत आहेत. अड्याळ जवळील नेरला येथील २७ मजुर हे धान कापणीकरीता टाटाएस वाहन क्र.एम एच ३६ एफ १०६० या वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे आज सकाळी ७.३० वाजता दरम्यान नेत असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक मालक महेंद्र मुरकुटे रा. नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले. त्यात वाहनातील २७ मजुर जखमी झाले. अपघाताची माहिती गावात होताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात जखमी मजुरांमध्ये छाया नेपाल भोयर (३४), मालु मोहन कावळे (३०), भागरथा धनराज आरीकर (५०), निर्मला तोताराम वाकडे (३५), शेवंता लेकराम भाकरे (५२), रोमीता उमेश बावणे (३८), वंदना दिनेश वाकडे (२५), मुक्ता रामलाल वाकडे (४०), जीरा रामेश्वर भोयर (६३), देवका रामदास पाल (५०), सिंधू रामु काकडे (५९), सिमा अतुल शहारे (३५), लता पुरूषोत्तम भोयर (४०), आशा वाकडे (४५), चालक महेंद्र मुरकुटे (३१), जयश्री ठाकरे (४०), गीता शहारे (३५), रंजना हिवरकर (२२), रिना बागडे (२०), भारती ठाकरे (३०), पंचफुला भोयर (६०), वंदना माकडे (२५), देवला ढोक (५०), दुर्गा चौधरी (३९), सरीता रोहनकर (३२), दुर्गा रोहनकर (४०), कुंदा ठाकरे (३५) यांना उपचार- ाकरीता ग्रामीण रूग्णालय अड्याळ येथे पाठविण्यात आले. उपचारानंतर १३ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तर १२ जखंमीवर अड्याळ येथे उपचार सुरू आहेत. तर २ जखमींना भंडाराला हलविण्यात आले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *