भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्यातून चिमुकल्यांना प्राथमिक शिक्षण मिळते तसेच त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता; अंगणवाडीतून बालकांचे कुपोषण संपूर्णत: नष्ट करावे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असतांना जिल्ह्यातील अशा अंगणवाडींची अवस्था बिकट आहेत. प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे मात्र सद्यस्थितीत या अंगणवाड्यांचा विकास कोसोदूर आहे. अशा परीस्थितीत अंगणवाडींच्या समस्या कोण सोडवणार? असा प्रश्न आपसूकच उपस्थित होतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १८७ इमारती निर्लेखनात आहेत म्हणजेच नादुरुस्त आहेत. त्यापैकी ५० अंगणवाडी केंद्राला मंजुरी मिळाली आहे. मिनी अंगणवाडी केंद्र १०९ पैकी १०० अंगणवाडी केंद्र भाड्याच्या घरात आहेत. त्यांना स्वत:ची इमारत नाही. अंगणवाडी मध्ये काम करणाºया सेविका व मदतनिसांच्या समस्या जशा कायम आहेत तशाच अंगणवाडींचीही समस्या सुटलेली नाहीत. परिणामी अंगणवाडीत शिकणारी बालके ही त्यांच्या हक्कापासून दुरावलीजात आहेत. या अंगणवाडीमधून पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण व आरोग्य व आहार शिक्षण अशी कार्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांना करावी लागते. कारण स्थानिक अंगणवाडी ही आईसीडीएसचा आधारशिला आहे.
खरं तर आईसीडीएस सेवात्याच्या केंद्रांच्या विशाल नेटवर्कद्वारे पुरवल्या जातात. त्याला ‘अंगणवाडी’ म्हणतात. नावाप्रमाणेच अंगणवाडी हे एक केंद्र आहे. अंगणवाडी केंद्रसेविका चालवतात आणि मदतनीस त्यांना मदत करतात. अंगणवाडी शब्दाचा अर्थ ‘अंगणामधील निवारा’ असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या. अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे लोकसंख्येच्या निकषांवर आधारित आहेत.
यात महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे आहे. तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबींकडे लक्ष पुरवणे आदी कार्यांचा समावेश अंगणवाडी बालकांमध्ये होतो. याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. एवढी कामे या अंगणवाडीतून होत असताना या समस्याग्रस्त अंगणवाडीच्या विकासाकडे लक्ष देणार कोण? याकडे आता सर्वांची लक्ष लागली आहे.