भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : तुमसर बपेरा राज्य मार्गावर चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी वाहनाच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला असुन या अपघातात दुचाकीस्वाराने आपला पाय गमावला आहे. त्याला उपचारासाठी तुमसरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना काल रविवारी दु. १२.३० च्या सुमारास सिंदपुरी गावालगत घडली. प्रकाश नेवारे (२८) वर्ष रा. धनेगाव असे दुचाकीस्वार जखमीचे नाव आहे. खड्ड्यात असणाºया भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची श्रृंखला सुरू झाली असल्याचा अनुभव रविवारी प्रत्यक्ष अनुभवास आलेला आहे.
बपेरावरून प्रकाश नेवारे हा तरुण गावाकडे जाण्यासाठी दुचाकी क्र. एम.एच. ३५ जे २०८४ ने निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील सिंदपुरी गावाच्या शेजारी येताच भरधाव वेगात येणाºया अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली, यात दुचाकी वाहनाला चारचाकी वाहनाने १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले, हे येथे उल्लेखित आहे. दुचाकीच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. पेट्रोल टँकवरून चारचाकी वाहनाचे चाक गेल्याने टँकचे नुकसान झाले आहे. चारचाकी वाहनासोबतच प्रकाश नेवारे हा तरुणही फरफटत गेला. अपघात झाल्याचे कळताच गावकरी आणि महामार्गावरून प्रवास करणारे नागरिक मदतीला धावून आले. गंभीर जखमी असलेल्या प्रकाश नेवारेला सिहोरा आणि नंतर तुमसरला उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळावरून चारचाकी चालक वाहनासह पसार झाला आहे. धनेगावात प्रकाश नेवारे यांचा अपघात झाल्याचे कळताच गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.