भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : आरोग्य सेवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे प्रत्येकाला आरोग्यसेवा मिळाली पाहिजे म्हणून या दृष्टिकोनातून शासनाने आरोग्य विषयक धोरण आखले आहे लाखनी तालुक्याची निर्मिती झाल्यापासून येथे असलेल्या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला तर येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा येथे हलविण्यात आले मात्र ग्रामीण रुग्णालयाला पाहिजे त्या प्रमाणात सोयी व सुविधांचा अजूनही अभाव आहे येथे ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत तर आहे मात्र औषधी भांडार कक्ष नसल्यामुळे रुग्णालयात आलेला औषधांच्या साठा रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या वार्डात करावा लागत आहे
ही बाब लक्षात घेता लाखनी ग्रामीण रुग्णालयाला औषधी भांडारकक्ष सन २०१९ मध्ये ३६ लक्ष रुपयाचे नव्याने बांधकाम मंजूर करण्यात आले होते मात्र तब्बल पाच वर्षाचा कालावधी उलटूनही औषधी भांडार कक्षात चे अजून पर्यंत बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे औषधी भांडार कक्षाचे बांधकाम होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र ज्या जागेत हे बांधकाम होणार आहे तिथे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत.