भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर नजीकच्या देव्हाडी उड्डाणपुलाच्या वळणमार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव मालवाहू ट्रकने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारचालक सुदैवाने बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक घनश्याम कुंभलकर (२६, तुडका) असे त्याचे नाव असून त्याच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलावरील वळण आता अपघाताला कारण ठरत आहे. पंधरा दिवसापूर्वी उड्डाणपलाच्या याच स्थळावर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला होता. अभिषेक कुंभलकर हे कारने (एम.एच.०२ बी.जे. ७९४३) येथे स्वगृही तुडका येथे परत जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाºया ट्रक (एम.एच. ४० बी.एल. ५९७८) ने स्विμट कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. त्यात कारच्या दर्शनी भागाचे तुकडे झाले. सुदैवाने येथे कारचालक कुंभलकर थोडक्यात बचावला. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तुमसर पोलिसांनी ट्रकचालक हैदर हुसेन (कामठी) यांच्या विरूद्ध भांदवि २७९,३३७, मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस उपनिरीक्षक सयाम करीत आहेत.
देव्हाडी उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची कारला धडक
