तीन जणांचा बळी घेणारा ‘तो’ वाघ अखेर जेरबंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी बफर वनपरिक्षेत्रातील भानुसखिंडी वाघिणीच्या बछड्याने निमढेला उपक्षेत्रातील जंगल व गावांमध्ये धुमाकुळ घालून गेल्या सहा महिन्यात तीन व्यक्तींचा बळी घेतला. त्या वाघाला अखेर, शनिवार, १८ मे रोजी सकाळच्या सुमारास बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाला यश आले. जेरबंद वाघाची प्रकृती उत्तम असून, त्याला नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र येथे हलविण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी दिली. या वाघाने निमढेला उपक्षेत्रातील बेंबळा, निमढेला व खानगाव येथील सुर्यभान हजारे, रामभाऊ हनवते व अंकुश खोब्रागडे या तिघांचा जीव घेतला. त्यामुळे या वाघाला पकडण्यासाठी गावकरी संतप्त झाले.

या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने पाऊले उचलले होती. या वाघाला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर येथून रेस्क्यू चमुला पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून या वाघाची शोध मोहीम सुरू होती. अखेर ताडोबा बफरमधील निमढेला परिसरात हा वाघ आढळून आला असता, त्याला पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शार्प शूटर अजय मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात बेशुद्ध करून पकडण्यात आले. धुमाकुळ घालणाºया या वाघाला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू आॅपरेशन राबविण्यात आले. निमढेला मधील कक्ष क्रमांक ५९ मध्ये रेस्क्यू आॅपरेशन राबवून वाघाला पकडल्या गेले. ही कार्यवाही ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, उपसंचालक कुशाग्र पाठक, सहाय्यक वनसंरक वाठोरे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वात यशस्वी पार पडली. त्या नरबळी वाघाला पकडल्यानंतर या परीसरातील नागरिकांनी वन विभागाचे आभार मानून सुस्कारा सोडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *