लाखांदूर तालुक्यात महसूल व पोलीस प्रशासन वाळू तस्करांपुढे हतबल

.भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : लाखांदुर तालुक्यात अवैधरित्या वाळूचा उपसा करणाºया वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाºया महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारी पैशाची उधळण यावरून यांच्यातील आर्थिक हितसबंध ऊतू चालल्याचे दिसून येत आहे. वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वत:ची यंत्रणाही तयार केली असून ही यंत्रणाच आता महसूलाच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासन मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. तालुक्यातील गावाचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी लहान मोठ्या नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. पूर्वी गावातील छोट्या मोठ्या बांधकामांपर्यंत मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, पोकलेन अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू उपसून शहरांकडे पाठवली जात आहे.

या वाळू उपशास आळा घालण्यासाठी सरकारने कडक नियम केले आहेत. परंतु, या नियमांची अंमलबजावणी होत नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वाळूचा उपसा करण्याचा नियम असला तरी रात्रीच्या वेळेसच वाळूचा उपसा होत आहे. नदीपात्रात वाहने उभी करुन त्यात वाळू भरून गुपचूपपणे गावाच्या बाहेर काढून दिली जातात. या वाळू उपशावर कारवाईसाठी महसूल विभागातील तहसीलदारांचे पथक कार्यरत आहे. परंतु या पथकातील अधिकारी आर्थिक लालचेपोटी पैशाच्या देवानघेवानीचे प्रमाण वाढले आहे. कारवाईसाठी आलेल्या पथकांवर तस्कर अधिकच मेहरबान दिसून येत असतात, म्हणून तस्करी सारखे प्रकार सातत्याने घडत आहे. तालुक्यातील तई, साखरा, दिघोरी, खोलमारा, धर्मापूरी कोच्छी, मांढळ, भागडी, चिचोली, ईटान, चप्राड, तई आथली, आसोला, नांदेड, दोनाड ईत्यादी भागात अशा घटना घडत आहेत. नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा करायचा. काही काळ ही वाळू साठवायची नंतर जादा दराने वाळूची विक्री करुन अमाप पैसे मिळवायचे. असा धंदा सध्या जोरात सुरू आहेत.

त्यामुळे या मार्गात अडथळा ठरणाºया महसूल विभागाच्या पथकांवर हल्ले करुन त्यांच्यावर राजकीय दडपण आणण्याचे प्रकार होत आहेत. तई, साखरा, दिघोरी, खोलमारा, धमार्पूरी कोच्छी, मांढळ, भागडी, चिचोली, ईटान आदी नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो. अवैधपणे होत असलेल्या या वाळू उपशाची माहिती गावातील काही सुजाण नागरिक महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी यांना महिती पुरवित असतात. मात्र माहिती असेल तरिपण त्याकडे दुर्लक्ष का केले जाते? पोलिस यंत्रणा काय करत असते? गावातून वाहने बाहेर कशी सोडली जातात? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यानंतर महसूल पथकाकडून कारवाई झालीच तर वाळूची वाहने ताब्यात घेऊन रस्त्यामधूनच वाहने गायब होत असतात. यंत्रसामग्री जप्त करणे अशी कारवाई होते. या जप्त केलेल्या वाहनांचा दंड संबंधितांनी भरल्यानंतर ही वाहने पुन्हा सोडून दिली जातात. या कारवाईनंतर वाळू उपशास आळा बसेल असे अपेक्षित असले तरी तसे मात्र झालेले नाही. वाळूचा उपसावाढतच आहे. यामुळे तालुक्यातील वाळूउपसा थांबविण्यासाठी कोणते अधिकारी सिंगम होऊन वाळू तस्करी थांबवतील असा सूर तालुक्यातील नागरिकाकडून निघत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *