भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पावसाळा तोंडावर आला आहे. जून महिन्यात मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस असतो. या काळात मोठ्या प्रमाणात वादळीवाºयासह विजांचा कडकडाट पाहायला मिळतो, अशात विजा पडण्याच्या घटनाही घडू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात वळीवाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह वळीवाचा पाऊस हजेरी लावत आहे. या वळीवाच्या पावसाच्या कालावधीत अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे आणि माणसांचाही मृत्यू होण्याच्या घटनाघडत असल्याचे दिसून येत आहे.