भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचे पदाधिकारी सदैव कार्यरत असतात. उदा. महापूर, भुकंप, अतिवृष्टी, घरांना आग. अशाप्रकारे विविध समस्या ग्रस्तांना मदतीला धावून जात असतात. एवढेच नाही तर महायुध्दात जखमी झालेल्या दोन्ही सैनिकांचे प्राण वाचविण्यासाठी सदैव प्रयत्न केले. म्हणून इंडियन रेड क्रॉस म्हणजे शांततेचा संदेश देण्याचे माध्यम आहे असे प्रतिपादन समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशनचे संचालक तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा भंडाराचे आजीवन सदस्य समीर नवाज यांनी केले.
ते सिल्ली येथील विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संस्कार चळवळ व गांधी विचार मंच भंडारा, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन व दि अर्बन को- आॅपरेटिव्ह बॅक, इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा भंडारा यांच्या वतीने आयोजित संस्कार शिबिरात इंडियन रेड क्रॉस दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्ली येथील सरपंच सुचिता पडोळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. भांडारकर, संस्कार शिबिर प्रमुख तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा भंडाराचे आजीवन सदस्य विलास केजरकर, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशनचे संचालक तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा भंडाराचे आजीवन सदस्य समीर नवाज, शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडाराचे कार्य व ज्युनियर रेड क्रॉस चे संस्थापक सर जेन हेन्री डयुनॉट यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन मार्गदर्शन केले.
उपस्थितांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडाराच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विविध मार्मिक उदाहरण देऊन गुणगौरव करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास केजरकर व प्रास्ताविकसंस्कार सहप्रमुख यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समीर नवाज यांनी मानले. संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिया देशमुख, श्रृती गभणे, प्रांजल आकरे, सांची सुखदेवे, प्राजक्ता ढुके, वैष्णवी बागडे, नैताली पारधी, संवेदना पडोळे, प्राजक्ता ढुके, वेदांती गभणे, वेदांत गभणे, श्रावणी पडोळे, प्रतिक साखरवाडे, श्रावणी गिºहेपुंजे, पूर्वी हेडाऊ, पूर्वेश गिºहेपुंजे, आराध्या लखडे, सोहम मस्के, मयुरी आकरे, मृन्मय साखरवाडे, नक्षत्र चोपकर, क्रिष्णा साखरवाडे, सुग्रा गिºहेपुंजे, जिया देशमुख, वेदांती गभणे, संवेदना पडोळे, त्रिशा साखरवाडे, वंश गभणे इत्यादी संस्कार शिबिरातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.