भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : सिहोरा ते धनेगाव रस्त्यावर १७ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास ज्या पट्टेदार वाघाने शेतात काम करणाºया शेतकºयांना व मजूर वर्गांना दर्शन दिले होते त्या वाघाने त्याच दिवशी मध्यरात्री चांदपुर जलाशय मार्गे जंगलाच्या दिशेने आपला पळ काढला आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर चांगलेच भयभीत झालेले आहेत. यासाठी घटनास्थळ वन विभाग पथकाच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. असे असले तरी नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगणे जरुरी असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी छ.ग. रहांगडाले हे सदर प्रतिनिधीशी बोलतांनी म्हणाले. ज्या वाघाने रानटी डुकराची शिकार करून आपले बस्तान ठोकले होते. ती सिमा सिहोरा, बोरगाव, धनेगाव व सोनेगावची असून त्याने नाल्याच्या कडेला करकाच्या रांजीला आपले गृह क्षेत्र बनविले होते. तो वाघ एक ते दोन महिन्यापासून त्याच क्षेत्रात आपली शिकार शोधत असल्याचे सांगितले जाते.
एक महिन्यापूर्वी धनेगाव शेतशिवारात एका शेतकºयाला त्याच्या पाऊल खुणा सुद्धा आढळल्या होत्या. तो शिकारीच्या शोधात संपूर्ण शेत शिवार पिंजून काढत असल्याचेही सांगीतले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी रानटी डुकराच्या नासाडी पासुन मोठ्या प्रमाणात बचाव झाल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकºयांच्या आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी छ.ग. रहांगडाले यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे १७ मे रोजी आम्ही आपल्या पथकासोबत रात्री ११.३० ते १२ पर्यंत त्या वाघावर पाळत ठेवून होतो. तो जंगलाच्या दिशेने पडावे म्हणून फटाकेही फोडण्यात आले. त्यानंतर सर्व आपापल्या घरी परतले. दुसº्या दिवशी १८ मे रोजी पुन्हा घटनास्थळ सर्च करण्यात आला. त्यात कुठेही वाघाच्या पाऊलखुणा किंवा कुठे दडुन असल्याचा सुगावा मिळाला नाही. तो जरी जंगलाच्या दिशेने पडला असला तरी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे. सकाळी १९ मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार रात्रीला त्या वाघाने पुन्हा दस्तक दिल्याची चर्चा आहे.