तिरोड्यातील ५ दुकाने फोडणारे आरोपी गजाआड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : दि. १८ मे रोजी पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तिरोडा गंज बाजार येथील किराणा, मेडीकल, सराफा अशा पाच दुकानाचे शटर तोंडुन दुकानांचे गल्ल्यातील चिल्लर व नगदी रोख चोरून नेली होती. तक्रारीवरुन तिरोडा पोलीस त्या अक्षात चोरट्यांच्या मागावर होते. अवघ्या दोन दिवसात त्यांनी यातील ५ चोरट्यांना गजाआड केले. तिरोडा शहरात एकाच रात्री चोरटयांनी ५ दुकाने फोडल्याने शहरातील व्यापारी वर्गात व नागरिकात भीतीचे वातावरण व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावरुन तिरोडा व्यापारी संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांना अटक करण्याची मागणी केल्यावरून वरीष्ठांनी तिरोडा शहरातील घडलेल्या चोरी प्रकरणाचे गांर्भीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा पथकास, तसेच पोलीस ठाणे तिरोडा पोलीसांना सदर गुन्हयातील चोरट्यांचा शोध घेवून जेरबंद करण्याबाबत निर्देशित दिले होते.

या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी, साहिल झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो . नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व तिरोडा पोलिस पथक सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना घटनास्थळ शेजारी तसेच तिरोडा शहरात लागलेले सीसीटिव्ही फुटेज ची तपासणी केली असता प्राप्त सीसीटिव्ही फुटेज आणि प्राप्त गोपनिय बातमीदार यांचे माहीती वरून सदर गुन्हयातील चोरटे यांनी एका काळया रंगाच्या मारूती अल्टो गाडीचा वापर केल्याचे दिसून आल्याने सदर संबंधात अधिक माहीती प्राप्त करून शोध केला असता ही गाडी ही भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुस नागपुर येथे उभी असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस पथकाने पो. ठाणे हिंगणा एमआयडीसी नागपुर येथे जावून तेथील पोलीस स्टॉफ चे मदतीने सदर गुन्हयात वापरलेली गाडी क्र. एम.एच. ३१ सीएम-६४३२ ही भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुला उभी असल्याचे दिसुन आल्याने कंपनीचे वॉचमैन यांस गाडीबाबत सखोल विचारपुस केली असता सदर कंपनीत काम करणारे गाडीचे मालक आरोपी रविकांत दयानंद गोंड (३७), रा. प्लॅट न. ९३ पी.एन. नायडू इंडस्ट्रियल एरीया नागलवाडी ता. हिंगणा नागपुर यांस ताब्यात घेवून तिरोडा येथे गुन्हयात त्याच्या गाडीचा झालेला वापर व गुन्हयासंबंधात सखोल विचारपुस केली असता सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेवून त्यास पुन्हा गुन्हयासंबंधाने विचारपुस चौकशी केली असता त्याने त्याचे मित्र आरोपी महेश बालाराम दुरूगकर (४४) रा. निलडोह नागपूर, नागेश हिरामण तिजारे (२३)रा. अमरनगर, ता. हिंगणा, नागपूर, समीर प्रमोद गडपायले (२४) रा. वानाडोंगरी नागपुर, आरोपी रियाज ऊर्फ राजा रमजान कुरेशी (२४) रा. नेहरू वार्ड तिरोडा व फरार आरोपी सौरभ गजभिये रा.जुनी वस्ती तिरोडा यांनी मिळून तिरोडा येथील चोरी केली असल्याचे कबूल केले. आरोपींच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेली मारूती अल्टो कंपनीचे चारचाकी वाहन, गुन्हयात चोरलेली रक्कम रुपए २९९०रुपए गुन्हयात हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. आरोपी क्र. १ ते ५ यांना गुन्हयात जेरबंद करून तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. तिरोडा पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता २२ तारखे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *