भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर-बपेरा राज्य मार्गावर भरधाव जड वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे वाहतूक करणाºया नागरिकांना क्षणाक्षणाला मृत्यू जवळ आल्याचा भास होतो. दरम्यान, संभावित अपघात टाळण्यासाठी ग्रामीण रस्त्यावरून ट्रक धावत असल्याने रस्ते खड्यात रूपांतरित झाले आहेत. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. गावातील घरे राज्यमार्गालगत असल्याने नागरिक आणि लहानमुलांचा वावर या राज्य मार्गालगत आहे. राज्य मार्गावरून वाहनांची भरधाव वर्दळ सुरू असल्याने भीती निर्माण झाली आहे. तुमसर डोंगरला ते बपेरापर्यंत राज्य मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. डोंगरला तें सिहोरा गावापर्यंत राज्य मार्गाच्या कडेला झुडपे वाढले आहेत. यामुळे दुहेरी वाहतूक अडचणीत येत आहे. परंतु, राज्यमार्ग दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला नाही.
सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गाला हस्तातरित झाल्याने संबधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत संताप आहे.तर या रस्त्यावरून अनेक वेळा आमदार, खासदार, मंत्रीही येथून प्रवास करतात.मात्र त्यांच्या ताफ्यालाही हे खड्डे समजत नसल्याने सर्वसामान्यांचा कणाकमकुवत होत चालला आहे.हा राज्यमार्ग खड्ड्यात गेला असल्याने नागरिकांत आक्रोश आहे.तरी सदर मार्गांवरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बोरकर यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.