भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- मद्यधुंद अवस्थेत असताना लोकांकडून अनेक अपघात होतात. स्वत:वर नियंत्रण नसल्यामुळे त्यांना शुद्धही नसते की आपण काय करतोय. त्यामुळे मद्यधुंद लोकांकडून अपघात झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशातच आणखी एक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. ज्यामध्ये एका मद्यधुंद व्यक्तीकडून महिलेचा मृत्यू झाला आणि दोन मुली थोडक्यात बचावल्या. जर रस्त्याच्या बाजूला आपले घर असेल तर जरा सावधान . रस्त्यावरून ये जा करत असताना एखादा ट्रॅक्टर किंवा एखादी चार चाकी आपल्या घरात अनियंत्रित होऊन आपल्या परिवारातीलएखाद्याच्या जीव जाऊ शकतो. अशीच एक घटना गोंदिया जिल्हयातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या किडांगीपार येथे घडली. श्रीमती किसना बुधराम चोरवाडे वय ५८ वर्ष ही आपल्या घरासमोर कपडे धुत असताना अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता. तो मद्यधुंद अवस्थेमध्ये ट्रॅक्टर चालवत होता.
त्याचं ट्रॅक्टर वरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर चक्क किसाना बाई यांच्या घरामध्ये शिरला त्या मुळे ट्रॅक्टरच्याचाकामध्ये येऊन किसणा बाई यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नात जवळच होत्या मात्र त्या थोडक्यात बचावल्या अन्यथा आज ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे तिघांचा जीव गेला असता मात्र या ट्रॅक्टर चालक च्या मद्यधुंद अवस्थेमुळे आज किसनाबाई आपल्या परिवाराला सोडून गेल्याने त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी १६३७ हा आरटीओ द्वारा पासिंग केला नव्हता. ट्रॉली अद्यापही नवीन विना नंबर असून आणि ती सुद्धा आरटीओ द्वारा पासिंग केलेली नव्हती. याबाबत आता आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.