भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- खाजगी शाळे प्रमाणे जिल्हा परिषद शाळेत सुद्धा शाळा सोडल्या दाखला (टीसी) देताना मुख्याध्यापक विदयार्थ्यांच्या पालकांकडून शाळा सुधार निधी म्हणून गोंदिया तालुका अंतर्गत येत असेल्या जिल्हा परिषद सावरीटोला या शाळेत पाच रुपय घेत असल्याची बातमी भंडारा पत्रिका ने प्रकाशित केली. त्या नंतर बातमीची दखल शिक्षण विभागाने घेतली व टी. एन.सोनवणे मुख्याध्यापकाने सुद्धा बातमी प्रकाशित झाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून शाळा सोडल्या दाखला (टीसी) देताना शाळा सुधार निधी म्हणून पाचशे रुपये घेतले त्या सर्व पालकांना पैसे परत केले आहे. तर शिक्षण विभागाने टी. एन. सोनवणे मुख्याध्यापक यांच्या या कारभारावर चौकशी चे आदेश दिलेआहे.
तर आता शिक्षण विभाग कधी चौकशी पूर्ण करते व संबंधित मुख्याध्यापक सोनवाने यांच्यावर कोणती कार्यवाही करते हे आता पहाणे महत्वाचे ठरणार आहे. कि या पुढे कोणत्याही जिल्हा परिषद शाळेत शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळा सुधार निधी म्हणून पैसे घेणार नाही. अशी खबरदारी शिक्षण विभाग घेणार असे पालकांना वाटत आहे. त्याच प्रमाणे टी. एन.सोनवणे हे सावरीटोला या शाळेतील मुख्याध्यापक असुन शाळेतील मस्टर हे घरी घेऊन जात असतात त्या मुले शाळेतील महत्व पूर्ण मस्टर घरी घेऊन जातअसल्यावर सुद्धा शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.