मोहाडी : तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२ वी कला शाखा परिक्षेच्या निकालात यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल ९४.५९ टक्के लागला. सायली श्रीराम कातोरे ८७ टक्के गुणासह शाळेतून अव्वल राहीली. शशांक नागेश्वर चिंधालोरे ८२.३३ टक्के गुणासह द्वितीय तर तनू बलवंत सुर्यवंशी ७४.१७ टक्के गुणासह तृतिय ठरली.जिल्हा परिषद कनिष्ठ कला महाविद्यालय पालोरा येथील एकूण ३७ विद्यार्थ्यांनी वर्ग १२ वीची परिक्षा दिली. त्यापैकी ३५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. शाळेतील तीन विद्यार्थी गुणवंत ठरले. तर प्रथम श्रेणीत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक राहीली. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावीत जल्लोष व्यक्त केला. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत व पेढे भरविले. गुणवंत विद्यार्थ्यांचे जि. प. सदस्य नरेश ईश्वरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज गोमासे, उपाध्यक्ष दिनेश मेश्राम व सर्व शाळा समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक एम. एस. मुदलियार, शिक्षक अजय निमजे, सुनिता शेंडे, राजेंद्र रंदये, कांबळे, सतीश समरीत, विनोद मेश्राम, सचिन मेश्राम व ईतर शिक्षक तसेच लिपीक शेंडे आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.