भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य मंडळाने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल मंगळवारी पोर्टलवर आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिखा मुरलीधर जसवानी हिने ९८.१७ टक्के गुणांसह सर्व शाखांमधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर याच महाविद्यालयातील सलिना सलीमखान ९७.५० टक्के गुणांसह जिल्ह्यात द्वितीय तर रिया दिलीप खानवानी ९५.१७ टक्के गुणांसह तृतीय आली. नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सर्व शाखांमधून प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत.
समर्थ महाविद्यालयाची शलाका पराड तालुक्यात प्रथम
लाखनी : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकाल आज दिनांक २१ मे २०२४ रोज मंगळवार ला दुपारी १ वाजता च्या दरम्यान माध्यमिक शालांत परीक्षा पुणे मार्फत जाहीर करण्यात आला. यात समर्थ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लाखनीचा शंभर टक्के निकाल लागला असून ९१ विद्यार्थ्यांपैकी ९१ उत्तीर्ण झाले. गोविंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथील शंभर टक्के निकाल लागला असून ११७ विद्यार्थी पैकी १९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. समर्थ महाविद्यालय येथील शलाका पराड या विद्यार्थिनीला ५६९ मिळत ९४. ८३ टक्के गुण प्राप्त करून ती तालुक्यातून प्रथम आली आहे.
समर्थ महाविद्यालय लाखनी येथील कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागाच्या एकत्रित निकाल ९१.२० टक्के लागला असून यासोबतच ज्ञानेश्वर कनिष्ठ कला महाविद्यालय सालेभाटा येथील ८८.४६ टक्के निकाल लागला आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच आता वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार आहे. लाखनी तालुक्यातील निकालाची टक्केवारी बघता मुलींनी यावर्षी बाजी मारलेली आहे. निकाल जाहीर होताच राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे, समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल बडवाईक, गोविंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन शेंडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यााचा निकाल ९४.६८ टक्के
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात २.४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्याचा निकाल ९४.६८ टक्के लागला असून जिल्हा विभागात दुसºया क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एकूण १६६ कनिष्ठ महाविद्यालयांतून १७३५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता, त्यापैकी १७२६१ विद्यार्थी परीक्षेला बसले, तर १६३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात ८१३९ मुलींचा समावेश आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी (९६.५३) मुलांपेक्षा (९२.९२) चांगली असून यंदाही जिल्ह्याच्या निकालात मुलींचीच सरशी असल्याचे दिसून आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १२३१ विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणी, तर ४७५४ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. प्राविण्य श्रेणी प्राप्त झालेल्यांमध्ये सर्वाधिक ३३४ विद्यार्थी ओम सत्य साई कनिष्ठ महाविद्यालय परसोडीचे, १९५ विद्यार्थी संत गुलाब बाबा डिफेन्स अकादमी शहापूरचे आणि ५४ विद्यार्थिनी नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा येथील आहेत.
प्रगती महाविद्यालयाचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल
भंडारा प्रगती महिला समाज भंडारा द्वारा संचालीत प्रगती कनिष्ठ महाविद्यालय भंडारा ह्यांचा नियमित ४ वषार्पासून १०० टक्के निकाल लागत आहे. ह्या वर्षी विज्ञान शाखेत कु. हुतेश्वरी झलके हिने ७९.८३% प्रथम, घनशाम त्रिपाटी ७९.५०% द्वितीय, मंज्योतसिंग कलसी ७८.३३% तृतिय क्रमांक पटकावला आहे. तसेच वाणिज्य शाखेत भार्गव रेहपाडे ८८.३३ % घेवून प्रथम क्रमांक पटकावले आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्था सचिव रेखा देशकर, शाळा समिती सदस्य प्रशांतराव देशकर, प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे व उप प्राचार्य पुष्पा ठाकरे शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी आणि कार्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले.