भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : केंद्र सरकारने देशातील जुने कायदे बदलले आहे. त्यासोबतच नवे कायदे संमत केले आहेत. या कायद्यांसंदर्भात पोलीस दलातील अधिकाºयांना माहिती व्हावी यासाठी पोलीस स्टेशन लाखांदूर कार्यालयात विधीज्ञांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये विधीज्ञांनी मार्गदर्शन केले. केंद्र शासनाने संसदेत कायदा संमत करून जुने भारतीय कायदे भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ यांच्यात बदल करून अनुक्रमे नवीन कायदे, भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे तीन नवीन कायदे तयार करून ते संमत केले आहेत. सदर कायदे संपूर्ण देशपातळीवर लवकरच लागू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लाखांदूर पोलीस दलात कार्यरत अधिकारी व अंमलदार यांना नवीन कायद्याबाबत माहिती व्हावी यासाठी पोलिस स्टेशन ठाणेदार यांनी २० में रोजी पोलीस स्काटेशन कार्यालयातील मिटींग हॉल येथे कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळाचे आयोजन केले.
कार्यशाळेत लाखांदूर येथील अॅड.ज्ञानेस्वर मेश्राम उपस्थित होते. त्यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदार यांना नवीन कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये अॅड. मेश्राम यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी जुन्या व नव्या कायद्याचे तुलनात्मक विश्लेषण करून नवीन कायदा हा पिडीत यांना केंद्रस्थानी माणून तयार करण्यात आल्याचे सांगितले. नवीन भारतीय न्याय संहितेत एकूण ३५८ कलमांचा समावेश आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ बाबत मार्गदर्शन केले. यांनी भारतीय साक्ष अधिनियम याविषयातील कायदेशिर बाबींवर मार्गदर्शन केले. यावेळी ठाणेदार पोलिस अधीकारी तसेच सर्व ठाणे प्रभारी, शाखा प्रमुख यांची कार्यशाळेला उपस्थिती होती.