भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: तालुक्यातील गणेशपूर परिसरात नियमीतपणे वानरांनी मोठा धुमाकुळ घातला असुन त्यातील ५ ते ६ वानरांची टोळी ही नियमीत गायत्री कॉलोनी गणेशपूर परिसरातील लोकांना त्रास देत असते. व नागरिकांचे मोठे नुकसान करतात. सदर वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परीसरातील नागरिकांनी केली असून याबाबतचे निवेदन वनपरिक्षक अधिकारी यांना देण्यात आले. याच आठवड्यात दि. १७ मे रोजी दु. १:३० वा. दरम्यान वार्डातील २ महिलांच्या अंगावर धावून त्यांना जखमी केले. त्यात एक महिला शेन्द्रे व दुसरी महिला सविता डुंभरे या गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच अनेक नागरिकांना देखील सातत्याने त्रास देवुन नुकसान करण्याचा व अपघात करण्याचा प्रयत्न वानर करीत असतात. त्यामुळे त्वरीत धुमाकूळ घालणाºया या वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा व वार्डातील लोकांना दहशतीतून मुक्त करावे. अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार तथा स्वयंरोजगार अध्यक्ष तथा सचिव काँग्रेस कमिटी पवन मस्के यांनी वनपरिक्ष्- ाक अधिकारी भंडारा यांना दिले आहे.
निवेदनाचा विचार करून आपण त्वरीत कारवाई करून काय कारवाई झाली हे लेखी स्वरूपात आठवड्याभरात कळवावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी पवन मस्के तसेच त्यांच्यासह वार्डातील नागरिक ओमकारेश्वर शेंद्रे, मीना गोखले, रोहिणी दिवटे, सुनिता चौधरी, दीपिका मांडवे, वसुंधरा हरडे, निकिता राऊत, लक्ष्मी सोनटक्के, शत्रुघ्ना ऊके, रेखा गिरेपुंजे, शालिनी मरघडे, अविनाश तिडके, चंद्रशेखर नंदनवार, लक्ष्मण नंदनवार, हेमंत नंदनवार, चेतना नंदनवार, साई भोंगाडे, छाया भोंगाडे, हर्षा नीनावे, पायल शेंडे, सलमा सय्यद, प्रणाली थोटे, निशा येडणे, कमलाबाई, श्वेता वाडीभस्मे, ललिता कांबळे आणि वार्डातील अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.