नक्षलवादी ठरवून निरपराध नागरिकांची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : मे महिन्यात छत्तीसगडच्या अबुझमाड परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या नावावर काही सामान्य नागरिकांना ठार मारले, असा गंभीर आरोप नक्षलवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने पात्रकातून केला आहे.छत्तीसगडसह महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाºया अबुझमाडच्या विस्तीर्ण जंगलात पाच महिन्यांत १०७ नक्षलवाद्यांचा छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला. अबुझमाड हा नक्षलवाद्यांचा गड आहे. गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोहीम, कम्युनिटी पोलिसींग यामुळे नक्षल चळवळीला हादरे बसले.

अनेक नक्षलवादी नेते चकमकीत ठार झाल्याने जिल्ह्यात ही हिंसक चळवळ काहीशी कमकुवत झाली आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या कुरापती सुरूच असतात. तेथे नक्षलवाद्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे तेथील पोलिसांनीही नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने एक पत्रक जारी करून छत्तीसगड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वन्यप्राण्यांच्या दहशतीत आदिवासी वषार्नुवर्षे जंगलात राहतात. मात्र, नक्षलवादी ठरवून निरपराध लोकांचा बळी घेतला जात आहे, असा आरोप त्याने केला आहे. याविरुद्ध जनआंदोलनाचीही हाक त्याने दिली आहे. या पत्रकात गडचिरोलीजिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथे १३ मे रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचाही उल्लेख आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *