१२ वी परिक्षेतअनुत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी निकाल जाहिर केला. यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यार्ची आत्महत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहराजवळील महादेव पहाडी परिसरात २१ मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. मोहित चंद्रप्रकाश पटले (१७) रा. ननसरी असे मृतकाचे नाव आहे. मोहित पटले स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. मंगळवार २१ मे रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयता १२ वीचा निकाल आभासी जाहीर केला. यानंतर मोहितने त्याचा निकाल बघीतला असता अनुत्तीर्ण झाल्याचे कळले. यानंतर त्याला नैराश्याने ग्रासले. सायंकाळी शहराजवळील महादेव पहाडीच्या सुनसान परिसरात तो गेला आणि याच परिसरातून गेलेल्या रेल्वे रूळावर रेल्वेगाडी पुढे उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर प्रेत कुटुंबियाच्या स्वाधिन करण्यात आले. यानंतर शोकाकुल वातावरणात मोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *