भरधाव ट्रकची एलसीबीच्या वाहनासह तीन वाहनांना धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- मालवाहू नेणाºया ट्रकच्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून येत असताना एसटी बसला व त्यानंतर पोलीस वाहनाला जबर धडक दिल्याची घटना आज, (दि. २२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोंदिया शहरातील रिंगरोड परिसरात घडली. घडलेल्या या विचित्र अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाºयांसह पाचजण गंभीर जखमी झाले आहे. साहिल कुडमेते असे मृत युवकाचे नाव आहे. सविस्तर असे की शहरातील कुडवा नाका, सहयोग हॉस्पीटल अवंती चौक परिसर ते रेल्वे क्रॉसींग दरम्यान आरोपी आयसर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत भरधाव वेगाने चालवुन कुडवा नाका ते सहयोग हॉस्पीटल दरम्यान एका एसटी बसला धडक दिली, ज्यामध्ये बसचे नुकसान झाले. यानंतर सदर ट्रकने समोरील ट्रकलाही धडक दिली. तर आणखी पुढे जात रेल्वे क्रॉसींग द्वारका लॉन समोरील स्पीड ब्रेकरवर पोलीस वाहनासही जोरदार धडक दिली. ज्यामध्ये पोलीस वाहन अक्षरश: हवेत उसळुन वाहनात बसलेले पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, व वाहन चालक मुरलीधर पांडे हे गंभीर जखमी झाले.

या विचित्र भिषण अपघातात ४ ते ५ वाहने एकमेकांना धडकल्याने दुचाकीस्वार साहिल कुडमेते वय २४ वर्ष रा. चंद्रपूर या युवकाचा मृत्यु झाला. तर स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व मुरली पांडे या चालकासह आकाश गावतुरे, रा. वडसा, पीयुष टेभूरणीकर रा. चंद्रपूर हे दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून ट्रक घेऊन ५०० मीटर पर्यंत समोर गेला व ट्रक उभा करून पसार झाला होता नंतर त्याला अटक करण्यात आली आहे. सदर वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *