भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचे बलस्थान आहे. निवडणुकांमध्ये याच कार्यकर्त्यांच्या भरोशावर विजयाचे स्वप्न साकार होते, असे मत खासदार सुनील मेंढे यांनी लाखांदूर येथे आयोजित बैठकीत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टीने लाखांदुर येथे बैठक घेण्यात आली. लाखांदूर क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत निवडणूक काळात जीव ओतून काम करणाºया पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व सहकाºयांचे खा. सुनिल मेंढे यांनी मनापासून आभार मानले. प्रत्येकाने निवडणूक आपली समजून घेतलेल्या परिश्रमामुळे यश गाठणे सोपे होणार असल्याचे यावेळी खासदार म्हणाले. या बैठकीत इतरही विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याबैठकीला नगराध्यक्ष लाखांदूर विनोद ठाकरे, वसंत एंचिलवार, कांचन गहाणे, तुळशीदास बुरडे,जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके, शिवाजी देशकर, दत्तराज दोनाडकर, विजय खरकटे, नगरसेविका सोफिया पठाण, नलिनी खरकटे, नीलम हुमणे, प्रिया धाकडे, विद्या गराडे, रज्जु पठाण, प्रकाश राऊत, अॅड. राऊत, राहुल नाकतोडे, सर्व शक्ती केंद्र प्रमुख व जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.