भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोरेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या मुरदोली येथील पोलिस पाटील दिलीप मेश्राम यांनी वनविभागाच्या व जिल्हा परिषदे कडून सावित्रीबाई फुले महिला बचतगट च्या जागेवर अतिक्रमण करून शेतात येण्या-जाण्याचा मार्ग अडविला आहे. तसेच जिल्हा परिषदे कडून गावातील महिलांना सावित्रीबाई फुले महिला बचतगट साठी जी सार्वजनिक जागा मिळाली त्या जागेवर बांधण्यात आलेल्या जनावरांच्या गोठ्यावर कब्जा केला आहे. स्वत:चे राहते घरही दुसºयाच्या मालकीच्या जागेत बांधले आहे. तथापि, पोलिस पाटलामुळे गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात आली असून, त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी किशोर मेश्रामसह गावकºयांनी गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली. किशोर मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, की मागील दोन-तीन वर्षांपूर्वी पोलिस पाटील दिलीप मेश्राम यांनी वनविभागाच्या गट क्रमांक २७१ मध्ये अतिक्रमण करून शेतात जाण्या-येण्याचा रस्ता अडविला आहे.
तसेच २० वर्षांपासून मुरदोली येथील सावित्रीबाई फुले महिला बचतगट यांना मिळालेल्या जनावरांच्या गोठ्यावर कब्जा केला आहे. तसेच गावातीलच प्रकाश रामचंद्र वाघाडे यांच्या मालकीच्या गट क्रमांक २४१ जागेवर ताबा करून घर बांधले आहे. इतकेच नव्हे, तर लालदास भंडारी डोंगरे यांच्या मालकीच्या जागेवरही घर बांधून त्यात वाचनालय सुरू केले. तथापि, या सर्व प्रकरणाची तक्रार तिरोडा येथील वनविभागासह उपविभागीय अधिकाºयांकडे करण्यात आली. उपविभागीय अधिकाºयांनी दिलेल्या आदेशावरून मोहाडीच्या मंडळ अधिकाºयांनी २ नोव्हेंबर २०२१ रोजी चौकशी केली. पंचनामा केला यात सर्व आरोप खरे असल्याचे पोलिस पाटलाने मान्य केले. चौकशी पंचनाम्यावर सही केली आहे. परंतु आजपर्यंत त्यांनी अतिक्रमणावरून ताबा सोडला नाही. उलट अतिक्रमण कायम ठेवण्यासाठी गावात भांडणे करून खोट्या तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. पोलिस पाटील दिलीप मेश्राम यांच्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही किशोर मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. १५ दिवसात शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला शिवलाल टेकाम, चंद्रशेखर भुरवार, कार्तिक मेंढे, मदनलाल भेंडारकर, संतोष कटरे, मोहन मानकर उपस्थित होते.