भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहराला नवीन ओळख देणाºया खांबतलाव वरील ५१ फुटा च्या प्रभू श्री रामाच्या भव्य दिव्य मूर्तीचे निर्माण कार्य सुरू आहे. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी या निर्माण कार्याची पाहणी करून पावसाळ्या पूर्वी निर्माण कार्य पूर्ण करून मूर्तीची स्थापना करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांना दिले. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा विधानसभेत विकास कार्यांचा सपाटा लावला आहे. यातच भंडाराचे आराध्य मानले जाणारे बहिरंगेश्वर देवस्थान ज्या तलावाच्या पाळीवर वसलेले आहे त्या खांब तलावाला सुद्धा धार्मिक महत्व लाभले आहे.
आम. भोंडेकर यांनी यातलावाचे कायापालट करून भंडाºयाला नवीन ओळख देण्याचे ठरविले आणि तलावच्या मध्यभागी रामाची ५१ फुट उंच मूर्ती स्थापनेचा निर्धार केला. याततलावाच्या पाळी पासून मूर्ती पर्यंत जाण्याकरिता पूल, तलावात बोटिंगची व्यवस्था, सोबतच तलावाभोवती सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या करीता गेल्या एक वर्षापासून निर्माण कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. आम. भोंडेकर यांनी बुधवारी सायंकाळी या निर्माण कार्याची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी आम. भोंडेकर यांनी कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बोलावून घेतले आणि कामासाठी लागणाºया लोकांची संख्या वाढवून कामाला गती देण्याचे निर्देश देत पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून रामाच्या मूर्तीची स्थापना करण्याची सूचना कंत्राटदारास केल्या.