कर्तव्यात कसूर करणारे नवेगाव (खुर्द) ग्रामसेवकावर होणार कार्यवाही

रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत नवेगाव (खुर्द) येथे कार्यरत ग्रामसेवक टेंभरे हे कामात हयगय करत असल्याने ते नियुक्त असलेल्या ग्रामपंचायतीचा कामात अडथळा येत असल्याने वारंवार त्यांना समज देण्यात येऊनही त्यांचे कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्याने जिल्हा परिषद गोंदियाकडे त्यांचा एक दोन तीन चार चा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ग्रामपंचायतचे प्रशासकीय कामकाज व्यवस्थित चालावे ,गाव विकासाकरता येणारे शासकीय योजनांची माहिती ग्रामपंचायत चे पदाधिकारी व गावकºयांना व्हावी गाव विकासाकरता येणारा शासकीय निधी योग्य प्रकारे खर्च होऊन गावाचा विकास व्हावा याकरता ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते.

मात्र तिरोडा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत नवेगाव येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक एस.जी टेंभरे हे नियुक्त असलेल्या ग्रामपंचायत मध्ये नियमित हजर न राहता आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावत नसून शासकीय निधी खर्चात भ्रष्टाचार झाल्याने तसेच वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतला चौकशी करता आले असता गैरहजर राहून त्यांना रेकॉर्ड उपलब्ध करून न देता चौकशी कामात अडथळा निर्माण करून व गावात ग्रामपंचायत तर्फे झालेले सौर ऊर्जा बोरवेलचे दुरुस्ती कामात झालेल्या भ्रष्टाचार दोषि पदाधिकारी व ग्रामसेवकावर कार्यवाही करावी म्हणून गावकºयांनी उपोषण केले याची चौकशी केली असता हे ग्रामसेवक दोषी आढळल्या वरून मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी ग्रामसेवकावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यावरून पंचायत समिती तिरोडा तर्फे ग्रामसेवक एस .जी. टेंभरे यांचा एक दोन तीन चार चा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद गोंदियाला पाठवण्यात आला असल्याने त्यांचेवर रीतसर कार्यवाही होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *