भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : स्थानीय नवजीवन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी मेहविश जहीर पटेल ने १२ वीच्या निकालात ९५.५०% गुण मिळवून भंडारा जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल संत हजरत भाई साहब बाबा उर्स कमेटी व साकोली मुस्लिम जमात च्या वतीने स्मृति चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी मुस्लिम समाजाचे सदर शमीमअन्सारी,सलीम पठाण, मुन्ना पठाण, जावेद शेख, अस्लम पठाण, शफिक शेख, राहील पठाण, परवेज शेख, सर्फराज शेख, तफज्जुल शेख, आदी उपस्थित होते. विद्यार्थिनी मेहविश जहीर पटेल च्या निवासस्थानी जाऊन तिचे व तिच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. मेहविशची मोठी बहीण आफरीन किर्गिस्तानमध्येएमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. आपल्या मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेऊन मेहविशनेही डॉक्टर होण्याची इच्छा बाळगली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सुद्धा जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या मेहविश जहीर पटेल चे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके , मेहविश चे वडील जहीर पटेल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.