भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते.
नागरिकांनाही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. डोंबिवलीत्या एमआयडीसी फेज दोन मध्ये अंबर केमिकल कंपनीत दुपारी २ ते २.३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या तसंच काही कासंर्चंही नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शथीर्चे प्रयत्न सुरु आहेत.