भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : कृष्णमूरारी कटकवार हायस्कुल साकोलीच्या पर्यावरण सेवा योजना महाराष्ट्र शासन माझी वसुंधरा ४.० उपक्रमाअंतर्गत तसेच राष्ट्रीय हरित सेनाअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे आयोजित नि:शुल्क ग्रीष्मकालीन ‘२२ व्या दहा दिवसीय पक्षी निरीक्षण व निसर्ग अभ्यास शिबिराचा’ एक भाग म्हणून नागझिरा अभयारण्यात निसर्गभ्रमंती १० व्या दिवशी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर वन्यजीव विभाग) साकोली यांचे सहकार्याने करून निसर्गशिबिरार्थीना खराखुरा निसर्गाअनुभव प्राप्त झाला. या उपक्रमाला ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोली तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा, अभाअंनिस जिल्हा शाखा भंडारा या निसर्गभ्रमंतीमध्ये शिबिराथीर्ना आरएफओ बळीराम भुते तसेच गाईड टेकाम त्याचबरोबर कटकवार विद्यालयातील पर्यावरण सेवा योजनाचे योजनाप्रमुख व राष्ट्रीय हरित सेनाअंतर्गत जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने व निसर्गमित्र युवराज बोबडे व स्काऊटगाईड शिक्षिका अंजना रणदिवे याचे मार्गदर्शन लाभले.
निसर्गभ्रमंती करताना शिबीराथीर्ना मत्स्यगरूड, सर्पगरूड, श्रुंगी घुबड, भृंगराज, हळद्या, टक्काचोर, नाचण, मधुबाज, युरेशियन थिक नी तसेच मोठ्या प्रमाणात दिसलेला राष्ट्रीय पक्षी मोर, स्वर्गीय नर्तक, अग्निशिखा, पांढरपोट्या कोतवाल, स्कॉलर्ड कॉप्स आऊल, नारिंगी कस्तुर इत्यादी शहरात सहसा न दिसणारे पक्षी सर्वसाधारणपणे इतर दिसणाºय पक्ष्यासोबत आढळले. एकूण ३० प्रकारचे पक्षी व १० प्रकारचे फुलपाखरे या निसर्गभ्रमंती मध्ये आढळले. त्याचसोबत महाराष्ट्राचा मानचिन्ह असलेला निलपरी ब्लु मोरमॉन, क्रिमसन रोज मोरमॉन, कॉमन रोज मोरमॉन, लाईम बटरμलाय, ड्यानाईड एगμलाय, मॅटल्ड इमिग्रेन्ट, कॉमन इमिग्रेन्ट इत्यादी फुलपाखरे अनेक चतुर व कोळी कीटक सोबत वैविध्यपूर्ण वृक्षलता-वेली, मगर सादृश्य येन झाड, धावडा, कांचनार वेल, जंगलातील वणवा पळस, कुसुम्ब, तिवस इत्यादी वनस्पती यांचे दर्शन घडले. त्याचप्रमाणे नागझिरा तलावाजवळ मचाण अनुभव घेतल्यानंतर दोन तासाच्या निसर्गभ्रमंतीमध्ये विविध वन्यजीवांचे दर्शन सुद्धा शिबिरार्थीना घडले.
अभयारण्यात वन्यजीवविभागाने केलेले वनव्यवस्थापन, सौरपम्पयुक्त पाणवठे, पर्यटक तसेच अधिकाºयांना राहण्यासाठी असलेले संकुले,रस्ते व पायवाटा, जंगलातील जाळ रेषा फायरलाईन, भ्रमंती करताना झाडातून पडणारे नैसर्गिक तुषार थेंब इत्यादींचा निसर्गाअनुभव शिबिरार्थीना एका वेगळयाच जंगल विश्वात घेऊन गेला. निसर्गभ्रमंतीमध्ये निसर्गस्वयंसेवक पूर्वा बहेकार, रुणाली निंबेकर, रोहिणी भैसारे, सुरेंद्र्र राऊत, समीर राऊत, भोवते समवेत अथर्व बहेकार, क्रिशा भांडारकर, तृषा जांभुळकर, जान्हवी धकाते, विराग गेडाम, संघदिप तरजूले, सुयोग तरजूले, अंश घोरमारे, आलिया टिकेकर, डॉली कोडापे, किरण धारणे यांनी सहभाग नोंदविला. निसर्गभ्रमंतीवरून परतल्यानंतर आलेल्या निसर्गाअनुभवाबद्दलचे मनोगत पूर्वा बहेकार, रोहिणी भैसारे, अथर्व बहेकार, व रुणाली निंबेकर यांनी पिटेझरी येथील संकुल परिसरात व्यक्त केले. याचवेळी निसर्गमित्र युवराज बोबडे, सुरेंद्र्र राऊत यांना पिटेझरी इथे आढळलेला रुखा साप (इंग्रजी नाव ब्रॉंझ ब्याक ट्री स्नेक, ग्रामीण भागातील नाव डोंगरयेल्या) याला सुरक्षित रेस्क्यू करून सोडले.
यावेळी आरएफओ बळीराम भुते यांनी निसर्गसंवर्धनविषयक स्वरचित काही कविता सादर केल्यानंतर नागझिरा निसर्गाअनुभव कार्यक्रमाची तसेच ‘२२ व्या १० दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिरा’ची यशस्वीपणे सांगता प्रमाणपत्रे वितरणानंतर करण्यात आली. नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव वनक्षेत्र विभाग (एनएनटीआर) पिटेझरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी बारसागडे व आरएफओ बळीराम भुते नागझिरा निसर्गभ्रमंती यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्धल आभार मानले. नागझिरा भ्रमंतीला प्राचार्य व्ही.एम.देवगिरकर, शिक्षिका अंजना रणदिवे, पुष्पा बोरकर, निलिमा बोरकर, प्रा.जागेश्वर तिडके यांचे समवेत इतर शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच प्राध्यापक वर्ग यांनी नियोजन व सहकार्य केले.