गोंदियात मित्रानेच केला मित्राचा खून

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: शुल्लक कारणावरून वाद निर्माण होत वाद विकोपाला जाऊन मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री वार्डातील जितेश चौक येथे २३ मेच्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. राहूल दिलीप बिसेन (२२) रा. शास्त्री वार्ड गोंदिया असे मृत तरुणाचे नाव तर प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (२३) रा. जितेश चौक, गोंदिया असे आरोपीचे नाव आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया छोट्या गोंदियाच्या जितेश चौकात २३ मे च्या रात्री ११:३० वाजताच्या सुमारास आरोपी व मृतक हे दोघेही असताना त्या दोघांत कुठल्यातरी कारणावरून त्यांचा वाद झाला.

या वादात आरोपी प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (२३) रा. जितेश चौक छोटा गोंदिया याने राहुल दिलीप (२२) रा. शास्त्री वार्ड छोटा गोंदिया याच्या पोटावर, छातीवर, शरीरावर धारदार चाकूने मारून त्याचा खून केला. या घटने संदर्भात मृतकाचे वडील दिलीप जीवनलाल बिसेन (४५) रा. मनोहर म्युनिसिपल जवळ शास्त्री वार्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रतीक भोयरविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांनी भेट दिली. सदर गुन्हयातील आरोपी प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर हा खुन केल्यानंतर घटनास्थळावरुन पळुन गेला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला काही तासासच अटक केली .

गुन्हयाचा प्राथमीक तपास पोउपनि मंगेश वानखडे यांनी केला असुन गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीनी बनकर करीत आहे. सदरची कारवाई पो. ठाणे गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे पथक सपोनि सोमनाथ कदम, सपोनि विजय गराड, सपोनि संजय पांढरे, पोउपनि मंगेश वानखडे, पोउपनि घनश्याम थेर, मपोउपनि पुजा सुरळकर, पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, श्याम कोरे, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, सनोज सपाटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्णे, पोहवा राजु मिश्रा, महेश मेहर, संतोष केदार, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, अजय रहांगडाले, चालक गौतम यांनी कामगिरी केली

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *