भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरीप हंगामात घेण्यात येणाºया धान, तूर, सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके तसेच ईतर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अतिशय फायदेशीर आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कडूनिंबाच्या झाडाला निंबोळ्या लागलेल्या असून त्या पावसाळा सुरु होण्यापूर्वी जमाकरून व्यवस्थितपणे साठवणूक करावी. जेणेकरून पिकांवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अकार्चा वापर करता येईल. यामुळे खर्चात बचत होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी निंबोळ्या गोळाकरून व्यवस्थितपणे साठवून ठेवा आणि येणाºया खरीप हंगामात किड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क तयार करून वापर करावा असे आवाहन डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आणि डॉ. प्रशांत एस. उंबरकर, शास्त्रज्ञ (किटकशास्र) कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांनी केले आहे. कडूनिंबाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणूनसुद्धा ओळखले जाते. झपाट्याने वाढणारे कडूनिंबाचे झाड मुळचे भारतीय भूखंडातील आहे. महाराष्ट्रात कडूनिंब सर्वत्र आढळतात.
या वृक्षाचा प्रत्येक भाग अतिशय उपयोगी आहे. अशा प्रकारचे बहु उपयोगी वृक्ष असल्यामुळे कृषि क्षेत्रात या झाडाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. महागड्या रासायनिक कीटकनाशकांचे अनेक दुष्परिणाम जगासमोर येत आहेत. अश्या रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा उदा. निंबोळी अकार्चा उपयोग करणे गरजेचे आहे. मानवी जीवास हानिकारक ठरणाºया रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हुणुन निंबोळी अकार्चा वापर करणे काळाची गरज आहे. त्याशिवाय कीड व्यवस्थापनात आवश्यक मित्र कीटकांचा या रासायनिक कीटकनाशकामुळे नाश होतो. यामुळे हानिकारककिडींपासून पिकांचे नैसर्गिकपणे संरक्षण होत नाही. मनुष्याच्या बाबतीत रासायनिक कीटक नाशकांचे दुष्परिणाम दिसत असल्यामुळे अनेक राष्ट्रांनी अश्या हानिकारक रासायनिक कीटकनाशके वापरण्यास कायद्याने बंदी आणली आहे. कडूनिंब या वृक्षाचे शास्त्रीय नाव अझाडीराकटा इंडीका असे आहे.