खड्डयात दडलाय रस्ता, शोधा म्हणजे सापडेल

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर- बपेरा- बालाघाट आंतरराज्यीय मार्गासह अनेक मार्ग जड वाहतुकीने खड्डेमय होउन या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डयात दडले रस्ते, शोधा म्हणजे सापडेल अशी गत या रस्त्यांची झालेली आहे. रस्ते खड्डेमय झाल्याचा खूप मोठा गवगवा केला जातो आहे. परंतु ते दुरुस्ती करण्यात यावे किंवा नवीनीकरण करण्यात यावे यासाठी बांधकाम विभागासह कोणताही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाही ही मोठी शोकांतिका आहे. यामुळे नागरिकांच्या मनात असंतोष खदखदु लागला आहे. या रस्त्यावर कितीतरी अपघात झाले व अपघाताची श्रुंखला सुरूच आहे. हे येथे उल्लेखनीय आहे. उत्तम दर्जाच्या रस्त्याने परिसराचा विकास होतो असे म्हटले जाते. रस्ते हे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहेत. रस्त्याच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो. परंतु, संबंधित यंत्रणेतील अधिकारी तथा परिसरातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे सिहोरा बपेरा, हरदोली दावेझरी व सिहोरा- धनेगाव मार्गावर दिसून येते. एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ चे स्वप्न साकार करण्याकडे वाटचाल केली असली तरी ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची स्थिती आजही स्वातंत्र्यपूर्व काळासारखीच असल्याचे दिसून येते. रस्त्याच्या विकासासाठी केंद्र सरकार तर्फे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तर राज्य सरकार तर्फे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडली जात आहेत. परंतु मुख्य मार्गाचीच दयनीय अवस्था असल्याने याला अपवाद ठरला आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावरील तसेच हरदोली, धनेगाव व दावेझरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान वाहन धारक खड्डे चुकविण्याचे नादात बाजूने वाहन काढतात व त्यातच त्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराज्यीय मार्ग असल्यामुळे या मार्गावर वाहनांची खूप मोठी वर्दळ असते. ओरलोड रेतीचे ट्रक व अदानीवरून राख भरुन येणारे ट्रक याच मागार्ने धावत असतात. वेळोवेळी या मार्गावर डांबर किंवा मुरमाचे थिगर सुद्धा लावले जातात. मात्र जड वाहतुकीने के दोन दिवसातच उखडून जातात. या डांबरीकरण मार्गावर ठिक ठिकाणी खड्डे पडून असल्याने वाहन धारक व ये-जा करणाºया वाहनांना व वाटसरूंना तारेवरचीच कसरत करावी लागते आहे. लोकप्रतिनिधी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या मार्गाच्या दुरुस्तीकडे तात्काळ लक्ष देऊन सदर राज्य मागार्ची दुरुस्ती व डांबरीकरण करावे अशी जनतेची मागणी होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *