भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त गोंडीटोला ग्रामपंचायतच्या सभागृहात गावातील राजकिय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ३ महिलांचा सरपंच शितल चिंचखेडे यांचे हस्ते रोख, ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात माजी उपसरपंच हिरालाल शहारे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश रहांगडाले, वैशाली पटले, अंगणवाडी सेविका विंदा गोंडाने, नरेंद्र चिंचखेडे, व्ही डी कोरे, एम, पी कटरे, रंजित चिंचखेडे उपस्थित होते. ग्रामपंचायत सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त सिलेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पेरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची फोटो ग्रामपंचायतला भेट दिली आहे. राज्य सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करून महिलांना सन्मानित करण्याचे निर्देश दिलेआहे. त्या अनुषंगाने सन २०२३ पासून गोंडीटोला ग्रामपंचायतमध्ये जयंती उत्सव साजरी करण्यात येत आहे.
जयंती दिनाचे औचित्य साधून राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी उपसरपंच कुंदा शहारे आणि प्रभा रहांगडाले तथा सेवाभावी कायार्साठी सविता चिंचखेडे यांना सरपंच शितल चिंचखेडे यांचे हस्ते रोख, ट्रॉफी, सभापती पं.स. समिती, पुरुषोत्तम जनबंधु (अ.जा) तालुकाध्यक्ष गोरेगांव, रामेश्वर महारवाड़े, पं.स. गोरेगांव, शैलेश नंदेश्वर, जि.प. सदस्य, गोंदिया, नितिन कटरे उपाध्यक्ष भाजपा गोरेगाव, सतीश रहांगडाले महामंत्री भाजपा गोरेगांव, राजेंद्र शहारे पदाधिकारी, दुर्योधन शहारे, दिपक बोपचे, मानिक भगत, ब्रिजलाल पारधी, मुनेश्वर रहांगडाले, किशोर मेश्राम, सोनाली साखरे, सरपंच, केशरीचंद मेश्राम, राजा कटरे, तेजेश्वरी मेश्राम, सलीम खरे सरपंच घोटी इत्यादी भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. गावांत गेल्या सहा दिवसापासून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, अपंग,व अन्य लाभार्थी योजनाचे आॅडिट करण्यासाठी प्रशिक्षतार्थी यांची नियुक्ती झाली आहे. सलग भर उन्हात घरोघरी जाऊन त्यांनी सेवा बजावली आहे.
प्रत्येक लाभार्थ्यांचे घरी आॅडिट केलेअसल्याने वैशाली कोरे मुरमाडी तुपकर ता. लाखनी आणि माधुरी प्रमोद कटरे आंबागड ता. तुमसर या महिला प्रक्षिनार्थी यांना शाल, श्रीफळ व पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान कार्यक्रमात नळ योजनेचे मार्च २०२५ पर्यंत कनेक्शन धारकाकडून ५०० रुपये सूट करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरपंच शितल चिंचखेडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यामुळे नळ कनेक्शन धारकांचे एक वर्षासाठी ६५००० रुपये सूट होणार आहेत. थकबाकी आणि ५०० रुपये पूर्ण भरल्यास त्याच कनेक्शन धारकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मे महिन्यात महाराष्ट्र दिनी गावातील ३१ कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान सरपंच शितल चिंचखेडे यांनी स्वत: चे सरपंच मानधनातून केला आहे. सरपंच चषक क्रिकेट प्रतियोगीतेची सुरुवात त्यांनी केली आहे. कार्यक्रमाचे संचालन रंजित चिंचखेडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश रहांगडाले यांनी केले.