भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सुर्याची तिव्रता वाढत असून सुर्य आग ओकत आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर पोहचला आहे. तापमानाचे या आधिचे सर्व उच्चांक यावर्षी मोडीस निघाले. उष्माघातामुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. उष्माघाताच्या ८ रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ३ दिवसात उष्माघाताने सहा लोकांचा जीव गेला. वैनगंगा नदीपात्रात दिवसभर मासेमारी करणाºया भंडारा तालुक्यातील खमारी/बुटी येथील शेखर वाणा चांदेकर (४६) या मासेमाराचा मृत्यू झाला. तर लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील मनोहर महागू निमजे (८०) व मिरा मनोहर निमजे (७०) या वृद्ध दामपत्याचा दि. १ जून रोजी उष्माघाताने मृत्यू झाला. अद्यापही उष्माघाताचा धोका कायम असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.