कत्तलीसाठी घेवुन जाणाºया जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीसांनी कत्तलीसाठी घेवुन जाणाºया १२ जनावरांची सुटका करीत जनावरे व बोलेरो वाहन असा एकुण मिळुन ४ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दि.१ जून रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गोबरवाही पोलीसांचे पथक हे मौजा सौदेपुर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना एक पांढ-या रंगाची महिंद्र बोलेरो पिकअप गाडी क्र. एम एच २८ बी बी ४९९८ भरधाव वेगाने सौदेपुर कडुन चिचोलीकडे जात असतांना दिसुन आली असता पोलीस- ांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता बोलेरो चा चालक आबीद शमीम अख्तर वय ३० वर्षे रा. कामठी जि. नागपुर याने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळवुन निघुन गेला.

पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांस पकडुन वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनात २ लालसर रंगाचे, १ काळपट रांगचे व ९ पांढºया रंगाचे गोवंश (गाई) अशा एकुण १२ जनावरांची अवैधरित्या कोंबुन वाहतुक केली जात असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी १२ जनावरे किंमत १ लाख २० हजार व बोलेरो वाहन किंमत ३ लाख ५० हजार असा एकुण मिळुन ४ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत बोलेरो चालक आबीद शमीम अख्तर याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गोबरवाही पोलीसात १४७/२०२४ कलम २७९, ३४ भादवी सह कलम ११(१),(ड),(ई) प्रा.नि.वा.का.अधि. १९६०, सहकलम ९ प्रा.सं. का. अधि. १९७६ सहकलम ५ (अ) बीवी,(१), ५ (ब) महा.प्रा. रक्षण सुधारीत अधि.१९९५ सह कलम २३९/१७७ मोवाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस स्टेशन गोबरवाही चे ठाणेदार विनोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो स्टे गोबरवाहीचे पोउपनि.भास्कर भोंगाडे, पोउपनि. लक्ष्मण जाधव,पो.शि. मुकेश सुरेश गायधने यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *