पवनीत देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनी इथुन कोरंभीकडे जाणाºया मार्गावरील हॉटेल विराज बारमध्ये चालणाºया अवैध देहव्यापाराचा भंडारा स्थागुशा ने भांडाफोड करीत एक महिला व एका इसमास ताब्यात घेतले. रूपेश शेंडे रा. चंडिकामाता मंदिर शनिवारी वार्ड, असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पवनी ते कोरंभीकडे जाणाºया मार्गावरील हॉटेल विराज बारमधील तळघरात देहव्यवसाय चालविल्या जात असल्याची माहिती भंडारा स्थागुशा च्या अधिकाºयांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे भंडारा स्थागुशाने एका बनावट ग्राहकाला स्थागुशाच्या पथकासह घटनास्थळी रवाना केले. मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री होताच बनावट ग्राहकाने स्थागुशाच्या पथकालाफोनकरून इशारा देताच स्थागुशा च्या अधिकाºयांनी हॉटेल विराज बारवर धाड टाकली. स्थागुशा च्या अधिकाºयाांनी हॉटेलच्या मागील बाजुने असलेल्या लोखंडी शिडीने खाली जावून पाहिले असता हॉल लगत असलेल्या एका बंदखोलीमध्ये बनावटी ग्राहक व पिडीत महिला दिसून आली. सदर पिडीत महिलेची स्थागुशाच्या महिला अधिकाºयांनी विचारपुस केली असता तिने सांगितले कि आरोपी रूपेश शेंडे रा. पवनी हा इसम पिडीत महिलेला हॉटेलमध्ये बोलवुन तिच्याकडुन देहव्यवसायकरून घेतो.

पोलीसांनी घटनास्थळावरून कंडोमचे पाकीट, नगदी पैसे व इतर साहित्य असा एकुण मिळुन ५,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी रूपेश सुर्यभान शेंडे वय ३६ वर्ष रा. याचे विरूध्द पो.स्टे. पवनी अप.क्र. २२४/ २०२४ कलम ३, ४, ५(१) (क) अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे पोनि नितीनकुमार चिंचोळकर, सपोनी केशव पुंजरवाड, मपोउपनि प्रिती कुळमेथे, पोहवा बेदुरकर, पोहवा पटोले, पोहवा बारापात्रे, पोहवा मस्के, मपोना पटले, मपोना कापगते, चापोहवा खराबे, चापोना तिवाडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *