भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील चार ते पाच वर्षापासुन हातभट्टीची दारू गाळणे व त्याची विक्री करून सामाजिक शांतता भंग करणाºया दोघांची एमपीडीए कायद्यान्वये भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. काजु तुकाराम भदाडे वय ३० वर्ष रा. अरविंद वार्ड वरठी ता.जि. भंडारा व सावन सुनिल देशपांडे वय ३० वर्ष रा.चिखली,त.पवनी जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. काजु तुकाराम भदाडे व सावन सुनिल देशपांडे यांनी आपल्या सोबत गुंड प्रवृतीच्या लोकांना सोबत घेऊन हातभट्टी मोहफुलाची दारु काढुन हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली. काजु भदाडे हा मागील ५ वर्षापासुन व सावन देशपांडे हा ४ वर्षापासुन हातभट्टी दारु काढण्याचे व्यवसायात सक्रिय असुन त्याचेवर पोलीस स्टेशन, वरठी व अड्याळ येथे हातभट्टी दारु निर्मीती व विक्री अशा प्रकारचे प्रत्येकी ४ गुन्हे दाखल असुन काही गुन्ह्यात दारु निर्माण करुन मिळालेल्या पैशाचे बळावर निर्दोष सुटका करीत आहे. त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते.
करीता जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदशार्नात काजु तुकाराम भदाडे व सावन सुनिल देशपांडे यांचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यांना दिनांक ०१ जून २०२४ रोजी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आदेशाने ताब्यात घेऊन भंडारा जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले. यापुढेसुध्दा अशा धोकादायक व्यक्ती, रेती तस्कर, हातभट्टीवाले यांचे गुन्हे अभिलेख तपासुन एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे कळविण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नितीनकुमार चिंचोळकर, वरठी पोस्टे.सहायक पोलीस निरीक्षक अभीजीत पाटील, अडळयाळ पोस्टे. चे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पो.हवा. राजेश पंचबुचे,पो.ना. अंकोश पुराम, पो. हवा सुभाष रंहागडाले, पो.शि. नितीन भालाधरे, पोशि. प्रतीक उके यांनी केली.