मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ४ जून रोजी होणाºया मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पलाडी परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी ४ जून रोजी मतमोजणी सकाळी आठ वाजता पासून सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा बैठक घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णत: कार्यरत होणार आहे.

मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठीआवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात येत आहे. सध्या पलाडी येथे असणाºया स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणीकोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसºया दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेºयाच्या माध्यमातून निगराणी केली जाते.

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा

अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतमोजणीसाठी निवडणूक निरीक्षक ११ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ श्री विनयसिंग व श्री सुशांत यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा अधिनस्त यंत्रणेच्या कामाचा आढावा पलाडी येथे घेतला.यावेळी दोन्ही निरीक्षकांनी मतमोजणी परिसराची पाहणी केली. मतमोजणी पूर्वतयारीच्या अनुषंगाने प्रत्येक नोडल अधिकाºयाची कामांची माहिती घेतली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *