भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लोकसभेचे मतदाना नंतर तब्बल दीड महिन्यांनी झालेल्या मतमोजणीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे विजयी झाल्याने तिरोडा तालुका काँग्रेस तर्फे तिरोड्यात जल्लोष करण्यात आला. एकोणवीस एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुकीचे पहिले टप्प्यात भंडारा गोंदिया जिल्ह्यात मतदान होऊन यात कोण विजयी होणार याची जवळपास दीड महिना वाट पाहून आज दिनांक ४ जून रोजी भंडारा येथे झालेले मतमोजणीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे विजयी झाल्यामुळे तिरोडा तालुक्यात सर्वत्र काँग्रेस कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून यात तिरोडा येथील गांधी पुतळ्या जवळून तिरोडा काँग्रेस अध्यक्ष रमेशभाऊ टेंभरे, शहराध्यक्ष पवन मोरे, शहर सचिव सौरभ चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मीनारायण दुबे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओम राधेलाल पटले, बबलु रहांगडाले, लक्ष्मीकांत उरकुडे, प्रवीण शेंडे, डॉक्टर निम्रोद पटले, डॉक्टर दिलीप ढाले, पं.स. सदस्य जे.पी. पटले, संजय जांभुळकर, रोहीत पटले, साबीर भाई यांचे सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी झेंडे घेऊन एकमेकांना मिठाई वाटून काँग्रेस उमेदवार डॉ.प्रशांत पडोळे यांचे विजयाचा जल्लोष केला.