वर्धेत ‘तुतारी’, कमळावर ‘भारी’!

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रामदास तडस आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात सामील झालेले अमर काळे यांच्यात थेट लढत झाली होती. दुसºया फेरीनंतर अमर काळे यांनी आघाडी घेत भाजपाचे रामदास तडस यांचा पराभव केला. सलग दोन वेळा भाजपाचे खासदार राहिलेले रामदास तडस यांना निकालाअंती मोठा धक्का बसला. अमर काळे यांचा जवळपास ८० हजार मतांनी विजय झाला. वर्धा लोकसभा मतदार संघात २४ उमेदवार मैदानात होते. परंतु, लढत मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारात झाली. मतदानानंतर आज सकाळपर्यंत तुतारीचीच चर्चा होती. परंतु, भाजपाचे संघटन मजबूत असल्याने अंतिम निकाल युतीच्या बाजूला लागेल असा अंदाज होता. सट्टेबाजाराचाही कल तडस यांच्याच बाजूने होता. परंतु, २१ व्या फेरीत रामदास तडस यांना ४ लाख ३ हजार ६८ तर अमर काळे यांना ४ लाख ६५ हजार ९९७ मतं मिळाल्याने काळे यांना ६२ हजार ९२९ मताधिक्य मिळाले. रात्री ९ वाजेपर्यंत अधिकृत अंतिम आकडेवारी हाती आलेली नव्हती. परंतु, महाविकास आघाडीचे अमर काळे यांचा विजय निश्चित झाला. येथील औद्योगिक वसाहत परिसरातील एफसीआय गोदाम येथे आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. पहाटे ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाली. त्यानंतर इव्हिएमच्या मतमोजणीला सुरूवात झाली. पहिली फेरी सुरू असताना रामदास तडस यांनी २३ मतांनी आघाडी घेतली होती. मात्र, २७ फेºयांपर्यंत रामदास तडस पिछाडीवर राहिले तर अमर काळे यांनी शेवटपर्यंत मोठ्या मताधिक्क्यांनी आघाडी घेत विजय मिळविला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *