भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजाच्या उलट निकाल लागल्याचे समोर आले आहे. राज्यात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळत असल्याचे दिसत आहे, देशातही चुरशीने लढत झालीआहे. बारामती, सांगली, सातारा, सोलापूर या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, आता या मतदारसंघाचे निकाल समोर आले आहेत. राज्यात लोकसभेचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उदयनराजे भोसले यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे.
मतमोजमीच्या सुरुवातीला वाई मतदार संघातून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले. कोरेगाव त्याबरोबरच सातारा तालुकाही शशिकांत शिंदे यांना सुरुवातीला चांगली आघाडी मिळाली. त्यानंतर, या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आणि कोरेगावातसुमारे पाच हजार, तर सातारा लोकसभा मतदारसंघात सुमारे २९ हजारांनी मताधिक्य मिळविले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी विजय मिळविला. अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर बारामतीत कोणाचे वर्चस्व येणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर निवडणुकीत शरद पवारांनी दाखवून दिले कि बारामती ही आमचीच आहे. सुप्रिया सुळे १ लाखांहून अधिक मताने निवडून आल्या आहेत.