गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान प्रचंड मताधिक्याने विजयी झाले असून, त्यांनी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा दारूण पराभव केला आहे. गडचिरोली मतदारसंघात ११ लाख ६२ हजार ४७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी डॉ. नामदेव किरसान यांनी ६ लाख १४ हजार ६१० मते घेतली असून त्यांनी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा १ लाख ४० हजार २३४ मतांनी पराभव केला आहे. भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना ४ लाख ७४ हजार ३७६ मते मिळाली आहेत.