शेतकºयांनी केली थेट पेरिव धान लागवड

साकोली : धान रोवणीसाठी लागणारे मजूर, चिखलणी करिता लागणाºया पाण्याची कमतरता, हवामानात झालेला बदल, मान्सूनची अनिश्चितता, भूजल संकट आणि भात उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे धान शेतीमध्ये शेतकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे पाहता भातशेतीची पारंपरिक पद्धत, थेट पेरणी पद्धतीचा पुन्हा अवलंब करावा लागेल, तरच भविष्यात आपल्याला पुरेसे धानाचे उत्पादन घेता येईल. म्हणुन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र साकोली व बायर डायरेक्ट एकर्स यांच्या माध्यमातून साकोली व लाखनी परिसरात मागील दोन दिवसात २० एकर शेतामध्ये विविध पेरणी भंडारा जिह्यातील जे शेतकरी पेरिव धान लागवड करू इच्छितात व त्यांच्याक- यंत्राने थेट पेरिव धान लागवड करण्यात आली आहे. डे अशा यंत्राची उपलब्धता आहे यांची सांगड घालून त्यामधून पेरिव धान लागवड क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता योगेश महल्ले विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी ) व मोहन कापगते (फील्ड आॅफिसर बायर डायरेक्ट एकर्स) यांच्या समन्वयातून आतेगाव, मुंडीपार, उमरझरी, सानगडी या परिसरातील एकूण ०८ शेतकº्यांच्या शेतावर मागील दोन दिवसात २० एकर शेतामध्ये विविध पेरणी यंत्राने थेट पेरिव धान लागवड करण्यात आली आहे.

या विविध यंत्रामध्ये बायर डायरेक्ट एकर्स यांच्या कडून प्राप्त जगजीत हॅपी सीडर, धान पेरणी यंत्र (राईस ग्रेन प्लांटर) तर शेतकरी पेरणी यंत्र पुरवठादारा मध्ये बहु पिक पेरणी यंत्र, प्लांटरच्या सहाय्याने थेट पेरिव धान लागवड करण्यात येत आहे. यामध्ये मिलिंद कापगते, गिरीधर कापगते, संजय वाघमारे उमरझरी, हिरालाल हटवार आतेगाव, विनोद झिंगरे व रामकृष्ण मानवतकर-सानगडी, एकनाथजी शेंडे मुंडीपार यांचा समावेश असून शेतकºयांना पेरणी यंत्र पुरवठादार म्हणुन दिलीप शेंडे (मुंडीपार), दिलीप गहाने (सिरेगाव बांध) व विवेक परशुरामकर (साकोली) यांनी सहकार्य केले. यावर्षी भंडारा जिल्ह्यात अधिक क्षेत्र थेट पेरिव धान लागवड तंत्रज्ञानाने पेरणी व्हावी यासाठी बायर डायरेक्ट एकरचे संजय सिंह (मार्केट डेवलपमेंट अग्रोनोमिस्ट), महेन्द्र जामुनपाणे (क्लस्टर इंचार्ज), हे प्रयत्नशील आहे. तर थेट पेरिव धान लागवड तंत्रज्ञानमध्ये विविध पेरणी यंत्राचा वापर वाढवा असे आव्हान डॉ. उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी शेतकºयांना केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *