नानाभाऊंना लागले मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : कधी कुणाला काय डोहाळे पडतील नेमच नाही. राजकारणात डोहाळे लागण्याचा प्रकार वारंवार अनुभवास येतो. सध्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले यात महाराष्ट्रात काँग्रेसने चांगलीच मजल मारली आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्ते वेगळ्याच डोहाळ्यात जगत आहेत. व्हायरल झालेल्या एका पोस्टरमध्ये नाना पटोलेंना चक्क भावी मुख्यमंत्री लिहले आहे. त्यामुळे अनेकांच्या नजर यांचावल्या आहे. दरम्यान या पोस्टरवर इंडिया आघाडीला मतदान केल्याबद्दल जरी आभार मानले असले तरी यावर काँग्रेसशिवाय कोणत्याही नेत्याचा फोटो लावण्यात आलेला असल्याने चचेर्ला उधाण आले आहे. सध्या मुख्यमंत्री होणे इतके सोपे झाले आहे की, मनात इच्छा आली की, कार्यकर्ते फलक लावून मोकळे होतात आणि मग नेत्याचेही ते फलक पाहून उर भरून येते. कधी राष्ट-वादीच्या कार्यकर्त्यांना वाटते त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावं तर कधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना.

ज्याला वाटलं त्याला फलक लावण्याची मुभा… असेच काही फलक सध्या लागले आहेत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हे फलक लावून पुन्हा एकदा नेत्यांना डोहाळे लागल्याचे या निमित्ताने उघड केले. आता असे डोहाळे महाविकास आघाडीच्या पक्षातील कार्यकर्त्यांना लागत राहणारच. पण ते पूर्ण करण्याच्या मानसिकतेत मतदार आहेत का? की आणखी कोणी ते पूर्ण करणार! काँग्रेसमध्ये असलेले वादंग आणि नेत्यांमधील कुरघोडी पहाता, हे डोहाळे सहजासहजी पूर्ण होणे शक्य नाही. पण एक मात्र नक्की, तेवढ्या पुरते का होईना, कार्यकर्ते आणि भाऊंचे पण समाधान झाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *