भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पावसाचे पडणारे पाणी वाहून जाण्याऐवजी त्याची साठवणूक व्हावी यासाठी शासनाकडून नेहमीच जनजागृती केली जाते. परंतु शासकीय कार्यालयांनाच रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विसर पडला असल्याचे दिसते. पडणाºया पावसाची साठवणूक करण्यासाठी जिल्हास्तरावरुनच सुचना करण्यात आल्या होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद शाळा तसेच इतर शासकीय इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग दिसत नसलयामुळे पडणारे पावसाचे पाणी वाहून जात आहे. जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. परंतु पडणारे पाणी साठविण्याची प्रशसकीय स्तरावर कठोर उपाययोजनाच होत नसल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच तडे जात आहे. याबाबत राजकीय स्तरावरुन तातडीने पावले उचलण्याची गरज असून नागरिकांनी देखील वाहून जाणाºया पाण्याची साठवणूक केली पाहिजे.
शिवाय ज्या शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा नसेल तिथे सदर यंत्रणा तातडीने बसविण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. केवळ शासनाकडे बोट न दाखविता नागरिकांनी आपल्या घरावर पडणारे पावसाचे पाणी अडवून त्याची साठवणूक केल्यास पाणी जमिनीत मुरेल. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्याची गरज आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्यास जमिनीत पाणी मुरेल व उन्हाळ्यात होणाºया पाणीटंचाईपासून सूटका मिळू शकेल. मात्र ही बाब जिल्ह्यात होत नसल्याने पावसाळ्यात लाखो लीटर पाणी वाहून जाते. तर उन्हाळ्यात एक लीटर पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.