भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया चा खासदार म्हणून मागील पाच वर्ष सेवा करण्याची संधी मतदारांनी दिली. या काळात मतदारसंघासाठी आणि पर्यायाने जनतेसाठी जे जे करता आले ते सर्व चांगले करण्याचा प्रयत्न केला. काल लागलेल्या निकालात मतदारांनी दिलेला कौल स्वीकारलेला आहे. भविष्यातही जनतेच्या सेवेसाठी आपली वाटचाल अशीच कायम राहील असा विश्वास मावळते खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या आलेल्या निकालानंतर त्याचा तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकार करीत मावळते खासदार सुनील मेंढे यांनी मतदार संघातील जनतेचे मनापासून आभार मानले आहे. राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना खासदार म्हणून लोकसभा मतदारसंघात काम करण्याची संधी पाच वर्षांपूर्वी मतदारांनी दिली. ती संधी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न मी केला.
वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचे काम मी केले. कोरोना काळातील लोकांची केलेली सेवा माज्यासाठी खºया अर्थाने अभिमान वाटावी अशी होती. त्या काळात अनेकांचे जीव वाचवू शकलो, हेही माझ्यासाठी भाग्याचे आहे. माज्या काळात भंडारा येथे मंजूर झालेले शासकीय रुग्णालय नक्कीच भविष्यात भंडारा जिल्ह्याच्या आरोग्यवस्थेला बळकटी देणारे ठरेल. प्रत्येक कामात माज्या पाठीशी येथील जनता खंबीरपणे उभी राहिली. दुसºयांदा निवडणुकीला सामोरे जाताना मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतांच्या स्वरूपात दिलेले दान माज्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे. निवडणुकीतील यश अपयश आपल्या हातात नसले तरीही लोकांशी जुळलेली नाळ कायम ठेवणे नक्कीच आपल्या हातात आहे. या निवडणुकीत जे मतांचे दान मतदारांनी माज्या परड्यात टाकले त्यासाठी नक्कीच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदारांचा आभारी असल्याचे सांगून भविष्यातही जुळलेले हे आपुलकीचे नाते असेच कायम राहील, असा विश्वास खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला.