रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालात भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाचे डॉ. प्रशांत पडोळे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याने आज कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असून हि खासदार रुपी भेट पडोळेंनी पटोलेंना दिली असल्याची चर्चा मतदारात दिसून येत आहे. भंडारा झ्रगोंदिया लोकसभेच्या प्रचाराची सर्व धुरा सांभाळत मला आपला भाऊ समजून, मुलगा समजून मतदान करा अशी आर्त हाक पटोले यांनी मतदारांना केली होती. पडोळेच्या रुपात मीच रिंगणात आहे असे चित्र प्रचारादरम्यान रंगविण्यात पटोले यांना यश आल्याने डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यात पटोले यांचा सिंहाचा वाटा आहे.
प्रसंगी देशाचे नेते राहुल गांधी यांचीही प्रचारसभा आपल्या मतदार संघात घडवून आणली आणि त्यानंतर मतदारात नवचैतन्य निर्माण होवून जनतेनी निवडणूक डोक्यावर घेतली त्याची परिणीतीम्हणून डॉ. प्रशांत पडोळे यांना मतदारांनी उचलून धरत खासदारकी बहाल केली. आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस असून हि खासदाररुपी भेट डॉ. पडोळेनी प्रदेशाध्यक्ष पटोलेला दिली असल्याची खमंग चर्चा मतदारात आहे. योगायोग असा की, ४ जूनला मतमोजणीचा निकाल आणि ५ जूनला पटोले चा वाढदिवस असा योग जुळून आल्याने आता पडोळे दिल्ली दरबारी स्थानिक प्रश्न घेवून आवाज उठविणार की…… परंतु नाना पटोलेनी डॉ.पडोळे वर टाकलेला विश्वास सार्थ करावा अशी मतदाराकडून अपेक्षा आहे. नाहीतर पूवार्नुभव लक्षात घेता पटोलेनी विकासाची गुरुकिल्लीची चाबी आमदार आणि खासदार मिळून उपयोगात आणावी अशी मतदारांची अपेक्षा आहे.