भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली: रब्बी हंगाम आता संपल्यात जमा असून शेतकºयांना आता खरिपाचे वेध लागले आहेत. गतवर्षी खरीप हंगामात झालेले नुकसान बाजूला सारुन पुन्हा बळीराजा जोमाने कामाला लागला आहे. खरीप हंगाम अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपल्याने नांगरनी, मोगडणे ही कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात आहेत. मशागतीची कामे खर्चीक असली तरी उत्पादन वाढीसाठी शेतकरी कोणतीही तडजोड करीत नाही. यंदाही खरिपात धान पिकावरच शेतकºयांचा भर राहिल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरिपाच्या अनुशंगाने आतापर्यंत तर सर्वकाही नियोजनानुसार सुरु असून वेळेत पाऊस झाला तर जून महिन्यात पेरणी पुर्ण होणार आहे. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच शेती मशागतीच्या कामांना सुरवात केली जाते. यामध्ये शेत जमिन नांगरून पुन्हा ती मोगडणे यामुळे जमिन पेरणीयोग्य तर होतेच पण पीक बहरण्यासही मदत होते.
रब्बी हंगामातील पीक काढणीनंतर लागलीच नांगरणीची कामे सुरु आहेत. तालुक्यात सर्वत्र धानाचे पीक घेतले जात असल्याने भर उन्हामध्ये शेती मशागतीची घाईगडबड पाहवयास मिळत आहे. मशागतीमुळे जमिनीचा पोत वाढतो व उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामे न करता रब्बी हंगामातील पीक काढणी झाली की नांगरण, मोगडण ही कामे शेतकºयांना करावी लागणार आहेत. यामुळे उन्हा लागल्याने जमिनीचा पोतवाढतो तर नांगरणीनंतरची मशागतही चांगली होते. पेरणी दरम्यान शेतजमिन भुसभुशीत असल्याने पीके जोमाने वाढतात तर पावसाच्या पाण्याचा निचराही होतो. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत ही महत्वाची असून शेतकºयांनी योग्य पध्दतीने मशागत करुन घेतली तर त्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होणार आहे.