भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इस्लामपूर येथील राज्य कार्यकारणीत लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्काराने विष्णुदास लोणारे यांना सन्मानित करण्यात आले. सांगली इस्लामपूर येथे आयोजित कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता विष्णुदास लोणारे यांना हा लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे हे होते.यावेळी संजय बनसोडे,अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रा. नितीन शिंदे,डॉ. गोराणे, उत्तम जोगदंड, दसरत शहारे उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल प्रा.युवराज खोब्रागडे, प्रा. नरेश आंबिलकर, प्रकाश नाकतोडे, नितेश बोरकर, माया बारापात्रे, अजय वासनिक, अश्विनी भिवगडे, त्रिवेणी वासनिक,कविता लोणारे, पुरुषोत्तम कांबळे, पुरुषोत्तम गायधने ,संजय कटारे ,चंद्रशेखर भिवगडे, चंद्रशेखर खोब्रागडे, डॉ. विश्वजीत थुलकर,डॉ. नरहरी नागलवाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.